Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ३६५ पोलिसांच्या अंतर्गत बदल्या; ५० जणांची मुख्यालयात बदली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

३६५ पोलिसांच्या अंतर्गत बदल्या; ५० जणांची मुख्यालयात बदली

Surajya Digital
Last updated: 2022/05/25 at 12:53 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ गुन्हे शाखेच्या पीआयपदी कोणाची वर्णी ?

सोलापूर – शहर पोलीस दलातील 365 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिले आहेत. विविध पालिस ठाण्यामधील तसेच शाखांमधील सुमारे ५० कर्मचाऱ्यांना मुख्यालयात पाठविण्यात आले. शहर गुन्हे शाखेतील २२ कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करण्यात आलीय. 365 internal police transfers; 50 transferred to headquarters crime branch

पोलीस शिपाई ते सहायक फौजदार दर्जाचा कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शहरांतर्गत बदल्या मंगळवारी (ता.24) करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक फौजदार आदींचा समावेश आहे. शहरातील सात पोलीस ठाणे व विविध शाखेच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये ३१८ व ४७ पोलीस कर्मचारी अशा दोन भागात एकूण ३६५ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पसंतीक्रम यांचा विचार करून पोलीस आयुक्तालय आस्थापना मंडळाने या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

आयुक्तालयात एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण केलेल्या सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई या पदाच्या ३१८ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. फौजदार चावडी पोलिस ठाणे, जेलरोड पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे, सलगर वस्ती पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, शहर वाहतूक शाखा, दहशतवाद विरोधी कक्ष, नियत्रंण कक्ष, दंगा नियत्रंण पथक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला सुरक्षा विभाग, नागरी सुविधा केंद्र, मोटार परिवहन विभाग, जलद प्रतिसाद पथक आदी विभागांमधील कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.

एकाच ठिकाणचा कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. तसेच आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

□ गुन्हे शाखेच्या पीआयपदी कोणाची वर्णी ?

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र या गुन्हे शाखेत कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. हे सर्व अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #internal #police #transfers #transferred #headquarters #crimebranch #solapur, #पोलिस #अंतर्गत #बदल्या #मुख्यालय #बदली #गुन्हे #शाखा #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेळगीत सिक्युरिटी गार्डने केली आत्महत्या; पुण्यातील बाप – लेकाने केली 29 लाखांची फसवणूक
Next Article पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पूर्वी बौध्द विहार होते; ज्येष्ठ साहित्यिकाचा दावा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?