तिरुअनंतपुरम : केरळमधील केआर विजयन यांचं निधन झालं. त्यांचं एक साधं चहा आणि कॉफीचं दुकान होतं. चहाच्या दुकानातील मिळणाऱ्या उत्पन्नावर विजयन यांनी त्यांची पत्नी मोहना यांच्यासोबत 26 देशांचा प्रवास केला आहे. तसेच वाचणा-यास आश्चर्य वाटेल हा सर्व प्रवास खर्च त्यांनी चहाच्या उत्पन्नावरुन केला आहे.
अमेरिका, स्वित्झर्लंड, ब्राझील, अर्जेंटिना, पेरु व इतर 26 देशांचा प्रवास केला आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दुःख व्यक्त केले.
https://twitter.com/KeralaTourism/status/1461656052798160897?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1461656052798160897%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केआर विजयन उर्फ बालाजी यांचे कोच्चीमधील गांधीनगर या ठिकाणी चहाचे दुकान आहे. केवळ चहाच्या दुकानातील मिळणाऱ्या उत्पन्नावर विजयन यांनी त्यांची पत्नी मोहना यांच्यासोबत अमेरिका, स्वित्झर्लंड, ब्राझील, अर्जेंटिना, पेरु आणि इतर 26 देशांचा प्रवास केला आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात रशिया या देशाला भेट दिली होती. हा त्यांचा अखेरचा आंतरराष्ट्रीय प्रवास ठरला आहे.
केरळा टूरिझमने त्यांचा फोटो ट्विट करुन आज अखेरच्या प्रवासाला निघालेल्या निडर प्रवासी के आर विजयन (बालाजी) यांना पर्यटन सलाम. त्याच्या आयुष्यातील अनेक टप्पे आणि त्याने मारलेल्या ट्रॅकवरून प्रवास करण्याचे धाडस कायम स्मरणात राहील, या आशयाचे ट्विट करुन अभिवादन केले आहे.
केआर विजयन यांचे केरळमधील गांधीनगर या ठिकाणी ‘श्री बालाजी कॉफी हाऊस’ या नावाचं एक साधं चहा आणि कॉफीचं दुकान आहे. 1988 साली त्यांनी हिमालयाचा प्रवास केला होता आणि त्यानंतर अनेक राज्यांना भेटी दिल्या होत्या.
या जोडप्याने 2007 साली पहिल्यांदा इजिप्त या देशाला भेट दिली आणि त्यानंतर आतापर्यंत 26 देशांचा प्रवास केला. या जोडप्याच्या जगभ्रंमतीने ज्यांना प्रवासाची आवड आहे अशा लोकांना प्रोत्साहित केलं आहे. गेल्या 16 वर्षात या जोडप्याने 26 देशांचा प्रवास केला आहे, तेही केवळ चहाच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हा प्रवास केला.