Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात विषबाधा, दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आई – वडिलांवर उपचार सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात विषबाधा, दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आई – वडिलांवर उपचार सुरू

Surajya Digital
Last updated: 2021/12/25 at 7:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे अन्नातून झालेल्या अज्ञात विषबाधेमुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींचा मृत्यू झाल्याने मरवडे गावावर शोककळा पसरली आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

भक्ती आबासाहेब चव्हाण (वय 06) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय 04) असे या मृत दोन चिमुकल्याची नावे आहेत. आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या भक्ती व नम्रता या लाडक्‍या लेकींसाठी मंगळवारी (ता. 21) मंगळवेढा येथील दुकानातून खाऊ आणला होता. हा खाऊ खाल्ल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाच अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी मंगळवेढा व पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले.

उपचारादरम्यान गुरुवारी (ता. 23) पहाटे आबासाहेब चव्हाण यांची मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू मंगळवेढा येथील खासगी दवाखान्यात झाला तर दुसरी मुलगी नम्रता हिचा मृत्यू गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान झाला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भक्ती ही मरवडे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती तर नम्रता ही बालवाडीत शिकत होती. भक्ती व नम्रता यांच्या गोड स्वभाव व हुशारीमुळे त्या सर्वांच्यात लाडक्‍या होत्या. भक्ती व नम्रता यांच्यावर मरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकाच कुटुंबातील दोघी बहिणींचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याने मरवडेत खळबळ उडाली. या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मृत मुलींचे वडील आबासाहेब व आई सुषमा यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेचा मंगळवेढा पोलिस ठाण्याकडून तपास केला जात आहे.

● माऊली कलेक्शनचा पत्रा उचकटून ५४ हजाराची कपडे लंपास
मोहोळ : मोहोळ शहरातील मेन रोडवर असणारे माऊली कलेक्शन  या कापड दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्री घडली.
याबाबत मोहोळ पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर असणारे माऊली कलेक्शन नावाचे दुकान मिनाक्षी उत्तम शिंदे या चालवतात. त्या नेहमी प्रमाणे गुरुवारी (२३ डिसेंबर)  त्या नेहमी प्रमाणे आपले माऊली कलेक्शन हे कापड दुकान संध्याकाळी सहा वाजता बंद करून गेल्या होत्या. मीनाक्षी यांचे दिराचे तहसील कार्यालयासमोर चहा कॅन्टीन आहे.
२४ डिसेंबर रोजी ते सकाळी त्यांचे चहा कॅन्टीन उघडण्यासाठी आले असता त्यांना माऊली कलेक्शनचा पत्रा उचकटलेला दिसला. तेव्हा त्यांनी त्यांच्या वहिनी यांना फोन लावून ही घटना सांगितली. यावेळी मिनाक्षी शिंदे यांनी येवून दुकान उघडून पाहणी केली असता दुकानाचा पत्रा उचकटून त्यांना गल्ल्यातील ठेवलेले रोख रक्कम २ हजार रुपये व ५२ हजार रुपयांचा माल यामध्ये जिन्स पॅन्ट, साडया, स्वेटर, लहान मुलांचे कपडे, परकर, होजीअरी असा एकूण ५४ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेलेला दिसून आल्याची फिर्याद मिनाक्षी शिंदे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद डावरे हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Poisoning #Solapur #death #sisters #mother #father #started, #सोलापूर #विषबाधा #सख्ख्या 'बहिणी #मृत्यू #आईवडिल #उपचार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article व्यापाऱ्याच्या कपाटांमध्ये सापडल्या कचऱ्यासारख्या नोटा, रोकड नेण्यासाठी मोठ्या कंटेनरची सोय
Next Article सोलापुरात पहाटे अपघात, दोन ठार तर चौघे जखमी, ओझेवाडीत तलवारीने मारहाण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?