मुंबई, 20 ऑगस्ट – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त आज (दि. २० ऑगस्ट) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव व परिवार प्रबंधक एस. राममूर्ती यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर सर्व उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा देण्यात आली.
या प्रतिज्ञेत – जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांतील भेद बाजूला ठेवून भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य व सामंजस्य जपण्याचे, तसेच सर्व मतभेद हिंसाचार न करता संविधानिक मार्गाने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.
दिवंगत राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरी केली जाते.
