Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पत्नीचा निर्घूण खून करणारा गजाआड, तवेरा गाडीत येऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पत्नीचा निर्घूण खून करणारा गजाआड, तवेरा गाडीत येऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2021/11/27 at 11:19 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : भर रस्त्यात मुलांसमोर पत्नीचा कोयत्याने सपासप वार करुन खून करणार्‍या किरण तुकाराम घरबुडवे (रा. भांतबरे ता. बार्शी) यास अखेर वैराग पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पत्नीला जीवे मारल्यानंतर तो घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पळून गेला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. आज तो बार्शीत असल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने जावून त्यास ताब्यात घेतले.
सासूरवाडीला तालुक्यातील धामणगाव येथे पत्नी व मुलांसह आलेला किरण मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ च्या सुमारास भातंबरे या आपल्या गावी परतत होता. रस्त्यात मुंगशी(आर.) ते उपळे दुमाला दरम्यान दुचाकीवरच त्यांच्यात वाद होवू लागल्यानंतर गाडी थांबवून त्याने गवतात लपवून ठेवलेला कोयता काढून बेसावध सोनालीवर वार केले.

गंभीर जखमी होवून जागेवरच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो पळून गेला. खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपासाधिकारी पो.नि. विनय बहीर अधिक तपास करीत आहेत. सोनालीला मारल्यानंतर किरण मुंगशी – गौडगाव – तुळजापूर – सोलापूर – पुणे -गुलबर्गा असा फिरत बार्शीस आला होता. त्याचा माग काढून अखेर त्यास गजाआड करण्यात आले.

* एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना अटक

सोलापूर : तवेरा गाडी घेऊन त्याद्वारे
एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला फौजदार चावडी पोलीस पोलीस पथकाने अटक करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या घटनेची हकीकत अशी की, २४ नोव्हेंबर च्या पहाटेच्या सुमारास जुना पुना नाका येथे नाकाबंदी करत असताना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार तिथे उभ्या असलेल्या तवेरा गाडी क्रमांक एम एच २४ व्ही ६४४ मधील दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणाला रोख रक्कम व साहित्यासह अटक केली.

संतोष संजय कांबळे (वय २९, अक्षय दिगंबर शिंदे दोघे रा. जय मल्हार चौक, भगवती मंदिराच्या मागे आडवां नळ सोलापूर), चंद्रकांत विठ्ठल दीक्षित, (वय २५ सतीश अनिल गायकवाड २४ रा दोघे शिवगंगा नगर भाग ५, कुमठा नाका सोलापूर) आणि आकाश महादेव माडगे (वय २० रा. कलपा मैत्री वस्ती, कुमठा नाका, सोलापूर ) या पाच जणांना अटक केली.

त्यांच्या ताब्यातून पाच लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची तवेरा गाडी, आठ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, १५ हजार रोख रक्कम, एक लोखंडी हातोडा, एक लोखंडी पार, एक लोखंडी टॉमी, लोखंडी छनी, मोठे चाकू, लोखंडी कोयता, सेट बॅ बेन्टेक्स दागिने, टायटन लेडीज घड्याळ, overline 1004 रंगाची असलेली मारतुल, मिरची पावडर असा जवळपास ५ लाख ७७ हजार २५९ रुपयांचा ऐवज जप्त केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Gajaad #brutally #murdered #wife #break #ATM #Taveracar, #पत्नी #निर्घूण #खून #गजाआड #तवेरा #गाडीत #एटीएम #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जुनी नाराजी, नवा वाद; यातूनच घडला प्रकार, वादाला टक्केवारीची धार
Next Article दुसऱ्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार वकिलाविरुद्ध  गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?