Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणवर हल्ल्यासाठी ट्रम्प यांची मान्यता, इराणकडून अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी अंतिम आदेश स्थगित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणवर हल्ल्यासाठी ट्रम्प यांची मान्यता, इराणकडून अणुकार्यक्रम थांबवण्यासाठी अंतिम आदेश स्थगित

admin
Last updated: 2025/06/19 at 6:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन डीसी , 19 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी (दि.१८) युद्धाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी कुठे आहेत हे आम्हाला माहित आहे पण त्यांना सध्या ठार मारण्याचा आमचा विचार नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेने जर लष्करी हस्तक्षेप केला, तर त्या देशाची कधीही भरून येणार नाही इतकी प्रचंड हानी होईल, असा इशारा खामेनी यांनी दिला. आता अखेर अमेरिका इराणविरुद्ध युद्धात उडी घेणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनेला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मान्यता दिली असून त्यांनी अंतिम आदेशाची वाट पाहण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या दरम्यान त्यांनी हल्ल्याला मान्यता दिली. मात्र तेहरान आपला अणुकार्यक्रम थांबवणार आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्रम्प यांनी अंतिम आदेश स्थगित केला आहे. जर इराण सरकारने आपला अणुकार्यक्रम थांबवला तरच ट्रम्प हल्ल्याची योजना थांबवतील, अन्यथा अमेरिका इस्रायलच्या वतीने इराणविरुद्धच्या युद्धात सामील होईल.

मीडिया रिपोर्टनुसार,या बैठकीला उपस्थित असलेल्या तीन वरिष्ठ सहकाऱ्यांनी एका अहवालात याबद्दल माहिती दिली. इस्रायली हल्ल्यांमध्ये सहभागी होण्याची धमकी देऊन तेहरान आपला अणुकार्यक्रम सोडून देईल अशी राष्ट्राध्यक्षांना आशा आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. इराणी सैन्याच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता असल्याने अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेतील तळांवरून काही विमाने आणि जहाजे हलवली आहेत. हा निर्णय अमेरिकन सैन्याच्या सुरक्षा योजनेचा एक भाग आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. किती विमाने किंवा जहाजे हलवण्यात आली आहेत आणि ती कुठे जातील याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिलेला नाही.

एकीकडे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचवणाऱ्या समर्थक गटांनी असं करण्यास नकार दिला आहे. त्यांना अमेरिकेला मध्य पूर्वेतील नवीन युद्धात ढकलला जाऊ नये असे वाटत आहे. या निर्णयामुळे ट्रम्प यांना सत्तेत आणणाऱ्या समर्थकांमध्ये एक फूट निर्माण झाली आहे. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांना मध्य पूर्वेतील नवीन युद्धात देशाला सहभागी करू नये असे आवाहन केले आहे

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “पेट्रोल पंपावरील शौचालय सार्वजनिक वापरासाठी नाहीत” – केरळ हायकोर्ट
Next Article राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?