Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर

admin
Last updated: 2025/06/18 at 7:39 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 18 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव आणखीन वाढत चालला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर “प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!”अशी पोस्ट केल्यामुळे तेहरान मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!” त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, “इराणने मी सांगितलेली ‘डील’ मान्य करायला पाहिजे होती. किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि किती मानवी नुकसान झाले आहे. मी वारंवार सांगितले आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळू शकत नाहीत.” ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर तेहरानमधील अनेक लोकांनी दावा केला की, त्यांची कुटुंबे राजधानी सोडून जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “माझ्या आईने सांगितले की ते सगळे तेहरान सोडत आहेत. सर्व लोक रस्त्यावर पळत आहेत. रस्त्यांवर इतकी गर्दी आहे की, गाड्या हलूही शकत नाहीत.”

दरम्यान, इस्रायलने गेल्या शुक्रवारी (१० जून) इराणवर अचानक हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांचा उद्देश इराणची अणुबॉम्ब ठिकाणे, वैज्ञानिक आणि लष्करी नेतृत्व यांना लक्ष्य करणे होता. इस्रायलचा दावा आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत.

या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर इराणमध्ये २२४ हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. सध्या तेहरानमध्ये सुमारे १ कोटी लोक राहतात, जी इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की, लोक खाण्यापिण्याचे सामान घेऊन पळत आहेत आणि शहर सोडण्याची स्पर्धाच लागली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन
Next Article भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?