Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुकाराम मुंढेंची अखेर बदली; दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची अखेर बदली; दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 8:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नागपूर : नागपूर महापालिकेतील भाजपा विरोधातील वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांना पदभार सोपवून तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी स्वीकारावी असा आदेश काढण्यात आला आहे.

दुसरीकडे तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

‘नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आयुक्तपदी कार्यरत असताना ते सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन अशा वादात सापडले होते. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. यावरून तुकाराम मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली होती.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #तुकाराममुंढे #बदली #नागपूर #महापालिका #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिलासा ! एमपीएससीची पुन्हा परीक्षा पुढे ढकलली; वेळापत्रक लवकर जाहीर होणार
Next Article पारधी कुटुंबात झालेल्या वादातून महिलेस पेट्रोल टाकून पेटवले; 14 जणांवर गुन्हा दाखल, आठजणांना अटक

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?