सोलापूर, 12 मे (हिं.स.)।हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भावि५कांच्या कारल समोरून येणाऱ्या हायवाची धडक होऊन भीषण अपघात घडला .या अपघातात दोन परप्रांतीय दामपंत्याचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात रविवारी (दि.११) मध्यरात्री ११.३० च्या दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाटा येथे झाला. हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जी रामू (वय ४५) जी माधुरी (वय ४०) दोघेही राहणारे हैद्राबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीवाणी ४१, अनुषा १७, मेघना १२, ऋषिका ०७, नागेश्वर राव ४५ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे दर्शन करण्यासाठी किया कॅरेन्स गाडी क्रमांक टी जी ०८ क्यू ०५५८ हैदराबाद हून ७ जण कारने रविवारी दुपारी १२ वाजता निघाले होते. शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवाची व कारची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत परप्रांतीय दांपत्य जागीच ठार झाले असून कारमधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी येऊन मदत कार्य सुरू केले. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबीद्वारे बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी महामार्ग 52 ची १०३३ रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन मृतदेह व जखमींना बाहेर काढले. जखमी झालेल्याना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.