Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट : पितापुरात दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट : पितापुरात दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर

Surajya Digital
Last updated: 2022/06/11 at 6:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…सचिन कल्याणशेट्टी आमदार,अक्कलकोट□  महाराष्ट्रात काँग्रेस करणार शक्तीप्रदर्शन

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धती बंधारे मंजूर झाल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. Akkalkot: MLA Sachin Kalyanshetti approves two Kolhapur style dams in Pitapur

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने 0 ते 100 हेक्टर प्रयत्नच्या सिंचन क्षमतेची कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती प्रस्तावित होती. त्यानुसार या दोन बंधाऱ्यांची निर्मितीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील पितापूर एक येथील बंधारा साठवण क्षमता 250.51 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 3 कोटी 59 लाख 91 हजार 213 रुपये असून अनुषंगिक खर्च 29 लाख 72 हजार 778 रुपये इतका असून एकूण खर्च हा 3 कोटी 89 लाख 63 हजार 991 रुपये एवढा आहे.

त्याची सिंचन क्षमता ही 90 हेक्टर एवढी असणार आहे. त्याचप्रमाणे पितापूर दोन येथील बंधारा साठवण क्षमता 296.73 सहस्त्र घन मीटर एवढा असून त्याचा खर्च 4 कोटी 42 लाख 13 हजार 87 रुपये असून अनुषंगिक खर्च 36 लाख 49 हजार 750 रुपये इतका आहे. एकूण खर्च हा 4 कोटी 78 लाख 62 हजार 837 रुपये एवढा आहे. त्याची सिंचन क्षमता ही 62.9 हेक्टर एवढी असणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

या पितापूर येथील दोन्ही बंधाऱ्यांचा एकूण 8 कोटी 68 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. पितापूर हे गाव कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील गाव आहे. दरवर्षी तुळजापूर भागात मोठा पाऊस होतो आणि हरणा नदीला पूर येत असतो. त्यामुळे ग्रामस्थ बांधवाना वाडी वस्तीवर जाणे आणी इतर महत्वाच्या कामासाठी पुराचे पाणी हा अडथळा ठरत होता.

या गावातील व भागातील ग्रामस्थांची सतत ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत होती. अखेर आमदार सचीन कल्याणशेट्टी यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे. प्रशासकीय मंजुरीने हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पूर्ण झाल्यास हा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

 

□ पितापूर गावाला दरवर्षी पुराच्या आणी मोठ्या पावसाने पाणी वाढत होते त्यातून ग्रामस्थांना सतत त्रास सहन करावा लागत होता.यासाठी पितापूर येथेच दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाले आहेत.यातून या भागातील नागरिकांना कायम सोसाव्या लागणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे.

सचिन कल्याणशेट्टी
आमदार,अक्कलकोट

 

 

□  महाराष्ट्रात काँग्रेस करणार शक्तीप्रदर्शन

 

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या समन्स विरोधात काँग्रेसने आंदोलन करायचं ठरवलं आहे. सोमवारी 13 जून रोजी सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट आणि नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि अमर राजूरकर यांच्यावर आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Akkalkot #MLA #SachinKalyanshetti #approves #two #Kolhapur #style #dams #Pitapur, #अक्कलकोट #पितापूर #दोन #कोल्हापूर #पद्धती #बंधारे #मंजूर #सचिनकल्याणशेट्टी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Sophisticated sprayer नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तयार केले अत्याधुनिक फवारणी यंत्र
Next Article मी शिवसेनेची साथ सोडणार नाही; भाजप खासदार विखेंच्या विधानाने भुवया उंचावल्या

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?