Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉलिवूडचे ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ हे दोन चित्रपट ऑस्करसाठी नामांकित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडदेश - विदेश

बॉलिवूडचे ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ हे दोन चित्रपट ऑस्करसाठी नामांकित

Surajya Digital
Last updated: 2021/10/22 at 5:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : ऑस्कर 2022 बॉलिवूडच्या दोन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. यामध्ये विद्या बालनचा शेरनी आणि विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ या चित्रपटांचा समावेश आहे. अमित व्ही मसूरकर दिग्दर्शित शेरनी चित्रपटात विद्या बालन एका वन अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे जी मनुष्यभक्षक वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते. तर सरदार उधम चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारी सरदार उधम सिंह यांच्या भूमिकेत आहे.

कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाच्या 94 व्या ऑस्कर पुरस्काराची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुढील वर्षी 27 मार्च 2022 रोजी 94 वे अकादमी पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी भारतीय चित्रपटातील अनेक चित्रपट ऑस्करसाठी नामांकित केले जातात. यंदा विद्या बालनचा ‘शेरनी’ आणि विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ हे दोन चित्रपट ऑस्कर 2022′ साठी नामांकित झाला आहे.

दरवर्षी ज्युरी ऑस्करसाठी अनेक चित्रपटांची निवड करते. ज्यूरीने भारतीय चित्रपटांमधून 14 चित्रपटांची निवड केली आहे. यापैकी फक्त एक अंतिम प्रवेशामध्ये समाविष्ट केला जाईल. या 14 चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट ‘नायतू’, तामिळ चित्रपट ‘मंडेला’, विद्या बालनचा हिंदी चित्रपटांमधील ‘शेरनी’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंह’ यांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यामुळे दोन्ही चित्रपटांचे स्टार्स आणि त्यांचे चाहते आणि इतर स्टार्सही त्यांचे अभिनंदन करत आहेत.शेरनी आणि सरदार उधम सिंग या चित्रपटांमधील कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अमित व्ही मसूरकर दिग्दर्शित शेरनी चित्रपटात विद्या बालन एका वन अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे जी मनुष्यभक्षक वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते. शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे कथानक मानव आणि प्राणी यांच्यावर अधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता.

‘सरदार उधम’ चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारी सरदार उधम सिंहच्या भूमिकेत आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडणाऱ्या एका क्रांतिकारकाची ही कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती शूजीत सरकार यांनी केली आहे. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता. विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट मोठा चर्चेत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Bollywood's #Sherni #SardarUdham #Oscar #nominated #films, #बॉलिवूड #शेरनी' #सरदारउधम #चित्रपट #ऑस्कर #नामांकित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उत्तर सोलापूर पंचायत सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, उपसभापतींना मारहाण
Next Article भातंबरे गोळीबार प्रकरण, नेम चुकून रिव्हॉल्वर झाली ‘लॉक’, पुढचा अनर्थ टळला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?