सोलापूर, 3 मे (हिं.स.)।
अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमानी अप्रेल्सच्या कारखान्यातील पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघा सफाई कर्मचार्यांचा मृत्यू झाला. यात सागर नारायण कांबळे (23, रा. स्वागत नगर) व सिद्धाराम यशवंत चलगेरी (28, रा. जुळे सोलापूर) अशी दोघा मृतांची नावे आहेत.
मृत सफाई कर्मचार्यांची स्वतःची टाकी स्वच्छ करून देण्याची वेबसाईट आहे. याद्वारे एमआयडीसी परिसरातील कारखानदाराने त्यांना टाकी स्वच्छ करण्यासाठी बोलावले. टाकी स्वच्छ करण्यासाठी चौघे कर्मचारी कारखान्यात आले. यावेळी त्यांनी टाकीमध्ये अॅसिड टाकले. अॅॅसिड टाकून चौघे नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले. नाश्ता करून आल्यानंतर यातील एक कर्मचारी टाकीमध्ये उतरला. त्याने टाकी धुण्यासाठी अॅसिड टाकल्यामुळे हौदात गॅस तयार होऊन त्याच्या नाकातोंडात गेल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला.