Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिरेहब्बू वाड्यातून ग्रंथ व भांड्यांची चोरी, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

हिरेहब्बू वाड्यातून ग्रंथ व भांड्यांची चोरी, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

Surajya Digital
Last updated: 2022/07/02 at 3:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच चोरीचा संशयस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच चोरीचा संशय

 

सोलापूर – कवी राघवन यांनी लिहिलेला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांवरील ग्रंथ व पूजेच्या भांड्यांची चोरी उत्तर कसब्यातील राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात गुरुवारी (ता. 30) रात्री झाली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Theft of books and utensils from Hirehabbu Wadya, two suspects arrested by police in Solapur

 

 

ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा नऊ अध्याय असलेला सुमारे ४० पानांचा ग्रंथ हिरेहब्बू वाड्यात एका सागवानी पेटीमध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी वाड्यात प्रवेश करुन हा ग्रंथ तसेच पितळी दिवा, तांबा धातूच्या तांब्या असा ऐवज पळवून नेला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर हिरेहब्बू हे पूजा करीत असताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती हिरेहब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली.

हत्तीवरून चरित्रग्रंथाची मिरवणूक काढली होती. ११४० ला कवी राघवाक यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे आत्मचरित्र कच्चकन्नड भाषेत लिहिले. हा ग्रंथ ५० पानांचा असून यामध्ये नऊ अध्याय आहेत. या अध्यायामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्याकाळी या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली होती असे सांगण्यात आले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

गुरुवारी रात्रीच ग्रंथाची चोरी झाली असावी, असा संशयही हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दोघेजण काहीतरी लपवून घेऊन जात असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांनीच चरित्रग्रंथ चोरल्याचे अद्याप तरी नक्की सांगता येणार नाही, असेही सांगण्यात आले. सागवानी पेटीला लोखंडी पट्टी लावून ग्रंथ ठेवला होता. कटावणीच्या सहाय्याने लोखंडी पट्टी उचकटून ग्रंथ चोरल्याचे दिसून येते.

सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथाची मागणी होत होती. परंतु हिरेहब्बू यांनी ग्रंथ देण्यास नकार दिला होता. आता तोच अमूल्य ग्रंथ चोरी झाला असल्याने ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच जाणून बुजून ग्रंथाची चोरी केली असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजवरुन दोघा संशयितांन ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

 

You Might Also Like

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही

सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले – प्रणिती शिंदे

TAGGED: #Theft #books #utensils #Hirehabbu #Wada #two #suspects #arrested #bypolice #Solapur, #सोलापूर #हिरेहब्बू #वाडा #ग्रंथ #भांडी #चोरी #संशयित #पोलिस #ताब्यात #गुन्हेगार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुन्हा चार सदस्य पद्धत होणार ? महापालिका निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता
Next Article मनीष काळजेंना निष्ठेचे फळ मिळणार ? 2012 पासून एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?