सांगोला प्रतिनिधी
तालुक्यातील बागलवाडी जवळील मठ वस्ती जवळ डम डम व दुचाकी वाहनाची धडक होऊन एक जण ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 23 मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत माहिती अशी की तालुक्यातील कटफळ येथील धनाजी लक्ष्मण दुधाळ (वय 32 )पत्नी अनिता दुधाळ (वय 28) आई केराबाई दुधाळ (वय 55) व लहान मुलगा असे चौघेजण मोटरसायकल (क्रमांक एम एच 45-ए वाय-74 42) वरून कटफळ कडून सांगोला येथे जात होते तर डम डम (क्रमांक एम एच 11-डी डी-26 33) हे चार चाकी वाहन सांगोल वरून म्हसवड कडे जात असता बागलवाडी जवळील मठ वस्ती चौकात दोन्ही वाहनांची धडक होऊन मोटारसायकल वरील धनाजी दुधाळ पत्नी अनिता आई केराबाई व लहान मुलगा असे गंभीर जखमी झाले यांना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता धनाजी दुधाळ हे उपचारापूर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले तर इतर तिघेजण खाजगी