Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऊळेगावात दुचाकी घसरल्याने तरुण ठार, अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

ऊळेगावात दुचाकी घसरल्याने तरुण ठार, अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/12/01 at 10:46 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : तुळजापूर रोडवरील  ऊळेगाव येथे दुचाकीवरून घसरल्याने धोंडीबा तुकाराम वाघमारे (वय २८ रा. विजापूर नाका झोपडपट्टी सोलापूर) हा तरुण गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाला. हा अपघात काल रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

मयत धोंडीबा वाघमारे हा त्याचा भाऊ चंद्रकांत वाघमारे याच्या दुचाकीवरून तामलवाडी ते सोलापूर असा प्रवास करीत होता.  उळेगाव येथील दर्शन हॉटेल जवळ दुचाकी घसरल्याने दोघेजण जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता धोंडीबा वाघमारे हा मरण पावला. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – एमआयडीसी परिसरातील अरफात नगर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सपना सुभाष चव्हाण (वय १७ रा. अरफात नगर) असे मयताचे नाव आहे आज सकाळी तिचे आई-वडील तुळजापूर येथे गेले होते. ती घरात एकटीच असताना छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतली होती. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत.

* सव्वा दोन लाखांची चोरी स्वतःच्या मुलावर गुन्हा दाखल

सोलापूर – बार्डी (तालुका पंढरपूर )येथे एका शेतकऱ्याच्या घरात रोख रकमेसह सव्वा दोन लाखाचे दागिने चोरीस गेले. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी दिवसा घडली. या प्रकरणात  करकंबच्या पोलिसांनी त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

बार्डी येथे आप्पासाहेब गुंडीबा रोकडे (व य६०) हे  शेतकरी राहण्यास आहेत.२४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातील कपाटाच्या ड्राव्हर मधून १ लाख ११रुपये रोख आणि ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा २ लाख १७ हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी आपला मुलगा आनंद आप्पासाहेब रोकडे याने केल्याची फिर्याद त्यांनी नुकतीच पोलिसात दाखल केली. पुढील तपास हवालदार वाघमारे  करीत आहेत .

* पुरंदावडे येथे दुकानाची भिंत फोडून  चोरी

पुरंदावडे (ता.माळशिरस) येथे राहणाऱ्या परमेष्ठी दिलीपकुमार जोशी यांच्या बंद किराणा दुकानाच्या डाव्या बाजूची भिंत  फोडून चोरट्याने १०हजार रुपये रोख आणि किराणा साहित्य असा ४१ हजाराचा माल पळविला. ही चोरी सोमवारी पहाटे झाल्याची फिर्याद जोशी यांनी माळशिरस पोलिसात दाखल केली. हवालदार भोसले पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Youngman #killed #two-wheeler #falls #Ulegaon, #ऊळेगाव #दुचाकी #घसरल्याने #तरुण #ठार #अल्पवयीन #तरुणी #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत शिकलेले पराग अग्रवाल झाला ट्विटरचा प्रमुख
Next Article एलपीजी सिलेंडर शंभर रूपयांनी महागला

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?