Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युएई’ने सुरू केला भारतासाठी गोल्डन व्हिसा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

युएई’ने सुरू केला भारतासाठी गोल्डन व्हिसा

admin
Last updated: 2025/07/07 at 3:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अबू धाबी, 7 जुलै (हिं.स.)।संयुक्त अरब अमीरात देशांने (यूएईने )भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. या नव्या योजनेत गुंतवणुकीची किंवा व्यवसायाची गरज नाही, फक्त नामांकनावर आधारित प्रणालीद्वारे हा व्हिसा मिळू शकतो.

याआधी गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी दुबईमध्ये एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणं किंवा सुमारे ४.६६ कोटी रुपये (२० लाख दिराम) किमतीची मालमत्ता खरेदी करणं आवश्यक होतं. पण आता नवीन योजनेत फक्त १ लाख दिराम (२३.३० लाख रुपये) शुल्क भरून गोल्डन व्हिसासाठी अर्ज करता येईल.ही योजना सध्या चाचणी पातळीवर भारत आणि बांगलादेशात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांत ५ हजारांपेक्षा अधिक भारतीय अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

या प्रक्रियेची जबाबदारी ‘रयाद ग्रुप’ नावाच्या कन्सल्टन्सी कंपनीकडे दिली गेली आहे. रयाद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रयाद कमाल अयूब यांनी ही योजना भारतीयांसाठी एक ‘गोल्डन संधी’ असल्याचं म्हटलं आहे. यानंतर ही योजना सीइपीए (Comprehensive Economic Partnership Agreement) देशांमध्येही राबवली जाईल.या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, ज्यात मनी लॉन्ड्रिंग आणि गुन्हेगारी इतिहासाची तपासणी असेल.याशिवाय अर्जदाराच्या सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जाईल. हा व्हिसा देताना अर्जदार यूएईच्या उद्योग, संस्कृती, विज्ञान, स्टार्टअप, व्यवसाय, किंवा इतर क्षेत्रांना कसा फायदा होईल, हेही पाहिलं जाईल. चाचणी पूर्ण झाल्यावर रयाद ग्रुप सरकारकडे शिफारस करेल, आणि सरकार अंतिम निर्णय घेईल.

य व्हिझासाठी अर्ज करण्यासाठी भारत आणि बांगलादेशातील वन वास्को सेंटर या ठिकाणी अर्ज करावा लागेल. तसेच रयाद ग्रुपचे नोंदणीकृत कार्यालय येथेही अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन पोर्टल किंवा कॉल सेंटर यांच्यामार्फत अर्ज करता येईल.अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला दुबईला प्रत्यक्ष जावं लागेल.या नव्या व्हिसाची खासियत म्हणजे तो संपत्तीवर आधारित नसल्यामुळे मालमत्ता विकली किंवा विभागली गेली, तरी व्हिसा रद्द होणार नाही. एकदा मिळालेला नामांकनाधारित व्हिसा कायमस्वरूपी असतो. याशिवाय, लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत आणता येईल, घरगडी किंवा ड्रायव्हर ठेवता येतील, आणि ते स्वतः व्यवसाय किंवा व्यावसायिक कामही करू शकतील. ही योजना भारतातून यूएईमध्ये स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या अनेक लोकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विराट कोहलीचा पुतण्या क्रिकेटच्या मैदानात
Next Article लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?