Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल – शरद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल – शरद पवार

Surajya Digital
Last updated: 2023/07/17 at 7:37 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

● अजित पवार गटाने दोन वेळा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांचे अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले आहेत. यातील अजित पवार गटाने पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे. यानंतर शरद पवारांनी ‘भाजपसोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल, अशी भूमिका त्यांच्या समर्थक आमदारांसमोर स्पष्ट केली. ‘Can’t go with BJP, have to go with Uddhav Thackeray and Congress – Sharad Pawar Ajit Pawar meeting role

 

अजित पवार गटाने दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील तर त्यात वाईट काय आहे, असे ते म्हणाले. तसेच शरद पवार आणि पंतप्रधान मोदी चांगले मित्र आहेत. महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे, असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, अजित पवार गट शरद पवारांना भेटून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्षातच आहे. तसेच पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. तसेच आमदार नाराज आहेत की नाही हे त्यांनाच विचारा, असेही ते म्हणाले.

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे बंडखोर नेते व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वारंवार भेट घेत आहेत. रविवारी आणि सोमवारी अशा दोन्ही दिवशी बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांची वायबी सेंटर येथे भेट घेतली. भूमिकेत बदल करण्यासाठी हे सर्व नेते पवारांना भेटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, कोणी कितीही भेटूद्या मी माझ्या भूमिकेत बदल करणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत शरद पवार यांनी अधिकृत प्रतिक्रिया अजून दिलेली नाही.

 

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. मागील तीन ते चार दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांना तिसऱ्यांदा भेटले आहेत. शरद पवार यांनी भाजपासोबत येण्यासंदर्भात शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार हे वारंवार साकडे घालत असल्याचे बोलले जातं आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

#WATCH | Nationalist Congress Party (NCP) Maharashtra President Jayant Patil speaks on Maharashtra Deputy CM Ajit Pawar and NCP MLAs of his faction meeting with Sharad Pawar, says, "They all have worked under the leadership of Sharad Pawar for a long time, so meeting him today is… pic.twitter.com/3yHo0RkMh4

— ANI (@ANI) July 17, 2023

 

अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेस पक्षाने मात्र आक्षेप घेतला आहे. बंद खोलीमध्ये होणाऱ्या चर्चा येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी दिली. तर आजची भेट कोणालाही आवडलेली नसल्याचे मत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे. शरद पवारांकडून हा महाराष्ट्र अपेक्षा ठेवतो. ते लोकशाहीच्या बाजूने उभे राहतील असा समज असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

 

● आमदारांनी सभागृहाकडे फिरवली पाठ

 

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीचे म्हणजे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे किती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूला किती आमदार असतील याचा फैसला आज (ता.१७) होणार होता. त्यातून पक्षीय पातळीवर कुणाचे पारडे जड आहे, याचाही निकाल लोकांपुढे येणार होता. मात्र, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी सभागृह कामकाजाकडे पाठ फिरवली.

 

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना नेमके किती आमदारांचे पाठबळ आहे, याचा निश्चित आकडा कळू शकला नाही. त्यामुळे अधिवेशनामध्येही कोणते आमदार कुणाच्या बाजूने आहेत, याचा आकडा समजू शकला नाही. कोणत्या गटात कोण आहे हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणेच टाळले.

अधिवेशनामध्ये शरद पवार समर्थक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, सुमन पाटील, रोहीत पवार, मानसिंग नाईक हे आमदार उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या बाजूने नऊ मंत्री आणि बबन शिंदे, इंद्रनील नाईक, प्रकाश सोळंके, किरण लहामटे, सुनील शेळके, सरोज अहिरे उपस्थित होते. इतर आमदारांनी मात्र, सभागृहात जाणे टाळले.

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #'Can'tgo #BJP #UddhavThackeray #Congress #SharadPawar #AjitPawar #meeting #role, #भाजप #उद्धवठाकरे #काँग्रेस #शरदपवार #राष्ट्रवादी #अजितपवार #गट #भेट #भूमिका #सभागृह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पावसाळी अधिवेशन : विरोधकांचा सभात्याग, विधानसभा पाठोपाठ विधानपरिषदही तहकूब
Next Article दहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात ना हरकत

Latest News

भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?