Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर

Surajya Digital
Last updated: 2021/05/11 at 7:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मराठा आरक्षणाविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला त्यांचा हक्क आम्ही मिळवून देणार, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा केंद्राने करावा, अशी मागणी करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार, असेही ते म्हणाले. आज ठाकरे यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

इंटरनेटशिवाय वापरा व्हॉट्सॲप !; नवीन फीचर https://t.co/PVxck1nw23

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवलेला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही. काय झाले ते सगळ्यांच्या समोरच आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं. देवेंद्र फडणवीसांनी बनवलेला तो कायदा जर फुलप्रूफ असता तर भेटण्याचा योग यासाठी आला नसता. भाजपलाही हा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असायला काही हरकत नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी, ट्वीट केलेला पहा व्हिडिओ https://t.co/64OEngLYvU

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

आरक्षणाचा न्यायहक्क मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याचा नसून केंद्राचा आहे. राष्ट्रपती महोदयांचा आहे. आम्ही आमच्या भावना राष्ट्रपती आणि केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. विधिमंडळात हा निर्णय एकमताने घेतलेला होता. त्याचा आदर करून या समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. राज्यपालांनी सांगितलं की, आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असंही ते म्हणालेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा आरक्षण मुद्दावर भेट #surajyadigital #मराठा #आरक्षण #सुराज्यडिजिटल #MarathaReservation #meeting #Governor
– मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी नेते हे राज्यपाल यांच्या भेटीला गेले. सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट. मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले pic.twitter.com/jwKgYw2uAe

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देऊ. आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता!
किती हा दुटप्पीपणा?

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 11, 2021

* देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर

“मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजप सरकारच्या काळात हाच कायदा उच्च न्यायालयात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते. परंतु नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?,” असा सवालही त्यांनी केला आहे.

काळ्या बुरशीजन्य म्युकोरोमायकॉसिस नावाच्या आजाराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अधिक माहिती देताना #surajyadigital #आजार #आरोग्यमंत्री #बुरशीजन्य #सुराज्यडिजिटल #माहिती #informationhttps://t.co/8JjtTDyoIu

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #Maratha #reservation #UddhavThackeray #announcement #Fadnavis #replied #CM, #मराठा #आरक्षण #उद्धवठाकरे #घोषणा #फडणवीसांनी #मुख्यमंत्र्यांना #प्रत्युत्तर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी
Next Article कोरोनाच्या भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी सोडली मुंबई

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?