अमरावती, 28 जुलै – शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच परंपरेत यंदाही शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटपाचा उपक्रम राबवला जाणार आहे.
नांदगाव शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना ३ ऑगस्ट रोजी हे नोटबुक वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या नोटबुकचे प्रकाशन नुकतेच मातोश्री, मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.