Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ । परमेश्वर पिंपरीत उजनी कॅनॉलमध्ये आढळला बेवारस मृतदेह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळ । परमेश्वर पिंपरीत उजनी कॅनॉलमध्ये आढळला बेवारस मृतदेह

Surajya Digital
Last updated: 2023/05/01 at 6:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● कोरवली येथील म. बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांनी केला अंत्यसंस्कार

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 विहिरीचे खोदकाम करताना डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार, अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील घटना

 

विरवडे बु – मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील उजनी कॅनॉल मध्ये शुक्रवारी ( दि. २८ एप्रिल ) सकाळी सुमारे ११ च्या दरम्यान पाण्यावर पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आले. Mohol Destitute body found in Ujani canal in Parameshwar Pimpri Social organization Funeral Solapur

 

कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना ही माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह काढून ते कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवले. अंदाजे ३५ ते ४० वय वर्षाच्या या बेवारस मृतदेहच्या अंगात करड्या रंगाची अंडरवियर असून शरीर बांधा अत्यंत मजबूत आहे.

 

कोरीलेली काळी दाढी, डोकेस काळे कमी केस, हातामध्ये लाल रंगाचा दोऱ्याचा गोफ अशा वर्णनाचा मृतदेह आहे. कोणीही ओळख पटवून ते बेवारस मृतदेह घेऊन गेले नसल्याने, कामती पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जीवराज कासविद यांनी कोरवली येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे दि. २९ रोजी त्या बेवारस मृतदेहाचे शव विच्छेदन करून कामती येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार जीवराज कासविद, कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे, संजय कस्तुरे, अमोगसिद्ध सुतार, बाळासाहेब नंदुरे, काशिनाथ म्हमाणे, जेसीबी चालक अभिजित सावंत, विठ्ठल ओहोळ, नागेश गायकवाड आदींसह सामाजिक समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 विहिरीचे खोदकाम करताना डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार, अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील घटना

 

सोलापूर : विहिरीचे खोदकाम करत असताना ५० ते ५५ फुटावरून मोठा दगड डोक्यात पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी शिवारात घडली. सुभाष सोमलिंग राठोड ( वय ४१, रा. जेऊर गोपाळ तांडा, ता अक्कलकोट ) असे त्या मयत मजुराचे नाव आहे.

 

विहिरीचे खोदकाम करीत असताना ५० फुट उंचीवरून दगड डोक्यात पडल्याने ४१ वर्षीय मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही दुर्घटना जेऊर (ता.अक्कलकोट) येथे शनिवारी (ता.29) सकाळच्या सुमारास घडली.

काल रविवारी (ता. ३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास ते जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी उंचावरून मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटल येथे दाखल केले असता ते रविवारी सकाळी मयत झाले.

मयत सुभाष राठोड यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेचे प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mohol #Destitute #body #found #Ujanicanal #ParameshwarPimpri #Social #organization #Funeral #Solapur, #मोहोळ #परमेश्वरपिंपरी #उजनीकॅनॉल #आढळला #बेवारस #मृतदेह #सामाजिकसंस्था #अंत्यसंस्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पीएम मोदींचे प्रेम मन कि बातवर, संविधानावर नाही, ‘मन कि बात सांगून लोकांना भूलथापा देतात’
Next Article बाजार समिती निवडणूक : प्रशांत परिचारक म्हणाले, साथ असेल तर नक्की 2024 ला गुलाल खेळू

Latest News

Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Živa ruleta v spletnih igralnicah v Sloveniji – Vodnik za igralce
Top News December 5, 2025
Зачем мы останавливаемся на размеренные отдых
Top News December 5, 2025
Почему мы лучше запоминаем моменты риска, чем спокойные периоды
Top News December 4, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?