सोलापूर, २३ ऑगस्ट: उजनी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग २.२५ लाख क्युसेकवरून आता ८५,००० क्युसेकवर घटवण्यात आल्यामुळे पंढरपूर भागातील महापुराचा धोका तूर्त टळला आहे. मात्र, आधीच सोडलेले पाणी पंढरपूरमधून वाहत असल्याने चंद्रभागा नदी अजूनही दुथडीभर वाहत आहे.
शहरातील सखल भाग आणि प्रमुख रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. पंढरपूर-तिर्हे-सोलापूर मार्ग आणि पंढरपूर-मंगळवेढा रोड बंद असल्याने जनजीवन अडखळले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती सामान्य होण्यास आणखी २-३ दिवस लागू शकतात.
नदीची पातळी सध्या इशारा पातळीकडे परतत असून, स्थानिक नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.