Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आनंद वार्ता : उजनी धरण 100 टक्के भरले; उजनीवरील बारा धरणात झपाट्याने वाढ, बंधा-याचे काम घेतले हाती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

आनंद वार्ता : उजनी धरण 100 टक्के भरले; उजनीवरील बारा धरणात झपाट्याने वाढ, बंधा-याचे काम घेतले हाती

Surajya Digital
Last updated: 2020/08/31 at 1:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / टेंभुर्णी : पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे.

पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018 , यानंतर 7 ऑगस्ट 2019 ला व आज 31 ऑगस्ट 2020  ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण पुणे परिसरात होत असणाऱ्या पावसामुळे वेगाने भरले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली आहेत. त्यामुळे त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात अजून अधिक वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात वरील बारा धरणात झपाट्याने वाढ झाली आहे. बरीच धरणे भरली असून त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे आज अखेर उजनी धरणात 117 टीएमसी पाणी साठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या दौंडवरून 23 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात उजनी धरण मायनसमध्ये गेले होते तर जून 2020 मध्ये सर्वात निचांकी म्हणजेच मायनस -24.15 टक्यांपर्यत  गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोऱ्यात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली होती.

* बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम घेतले हाती

पंढरपूर शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता.  भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. यंदा सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून उजनी धारणातही वेगाने पाणी जमा होत आहे. अशावेळी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी अखेर नगरपालिकेने या बंधाऱ्याच्या मजबुतीकरण करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिकांत भीती कमी झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत असल्याने बंधाऱ्याच्या भराव खचू लागला होता.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #उजनी #शंमरटक्के #शेतकरी #आनंद #वातावरण #बंधा-याच्या #मजबुतीकरणाचे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंदोलनाला वारक-यांनी फिरवली पाठ; वंचितच्या कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात भजन आंदोलन
Next Article न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना सुनावली एक रुपया दंडाची शिक्षा; दंड न भरल्या…

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?