Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरकरिता शनिवारपासून उजनीतून ऊन्हाळी आवर्तन सुटणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरकरिता शनिवारपासून उजनीतून ऊन्हाळी आवर्तन सुटणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 9:05 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून कालव्याला 20 ते 21 मार्च रोजी, तर भीमा नदीला 23 मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे. याबरोबरच सीना नदी, सीना-माढा उपसा सिंचन या योजनांनाही पाणी सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता सध्या जाणवू लागल्यामुळे कालव्याला व नदीला पाणी सोडण्याची मागणी वाढू लागलेली आहे. प्रत्येक भागातून शेतकरी आमदार शिंदे यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करत होते. त्यातच शेतकऱ्यांना गेली वर्षभर कोरोनामुळे प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. मार्च महिना सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी पाणी सोडण्याचे मान्य केले आहे.

* उजनीत प्लस 64 टक्के पाणीसाठा

उजनी धरणामध्ये सद्यस्थितीला प्लस 64 टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा आहे. या पाण्यामुळे ऊस, केळी, द्राक्ष, मका, भुईमूग, मूग या पिकांना फायदा होणार आहे. हे आवर्तन मार्च ते एप्रिल या महिन्यात देण्यात येणार असून, हे आवर्तन संपल्यावर उन्हाळी हंगामात दुसरे आवर्तनही सोडण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Ujani-dam #Solapur #water #distribution, #सोलापूरकरिता #शनिवारपासून #उजनीतून #ऊन्हाळीआवर्तन #सुटणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या जावई आणि मुलीची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त
Next Article जसप्रीत बुमराह अडकला विवाहबंधनात, झाला पुण्याचा जावई

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?