* शासन स्तरावर प्रकल्प मंजूरीसाठी जोरदार प्रयत्न
* आ. राजेंद्र राऊतांकडून पाठपुरावा
* भोगावतीत पाणी सोडण्यासाठी दोन ठिकाणांची चाचपणी
* लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत होणार
सोलापूर : बार्शी, माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यातील गावांसाठी वरदायिनी ठरू पाहणाऱ्या बहूचर्चीत सीना – भोगावती जोड कालव्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश निघाले आहेत. Re-Survey MLA Rajendra Raut Ujani Reservoir for Sina-Bhogavati Link Canal
दरम्यान या प्रकल्पांतर्गत भोगावती नदीत दोन ठिकाणांपैकी कोठून पाणी आणून सोडता येईल, याची पडताळणी करण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजूरीसाठी बार्शीचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सूरू आहे.
बार्शी तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरीता सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील महिन्यात बार्शी तालुक्यातील १५ गावांसह चार तालुक्यातील सिंचनासाठी महत्त्वकांक्षी असलेला सीना भोगावती जोड कालव्याच्या प्रकल्पाचा नवीन सर्वे करण्यासाठी संबंधित अधिकारी व शेतकरी बांधवांसोबत इर्ले या गावी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी अधिकारी व शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीना – भोगावती जोड कालव्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक लावणार असल्याची माहिती या बैठकीत त्यांनी दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आमदार राजेंद्र राऊत, जलसंपदा विभागाचे सचिव वी. वी. राजपूत व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत सदर योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना व इतर चार तालुक्यांना या योजनेचा कसा लाभ होईल याबाबत माहिती देण्यात आली होती.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून, या योजनेच्या फेर सर्वेक्षण संदर्भात आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार, या योजनेचा सर्वे करण्यास महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाच्या उपसचिव जया पोतदार यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना पत्राद्वारे कळविले असून लवकरच सीना भोगावती जोड कालवा होण्याबाबत, सीना नदीवरून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पुनर्भरण प्रकल्पाचे लाभ क्षेत्र सर्वेक्षणा बाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.