सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामास आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाइप बल्लारी येथून आणण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात सोरेगाव ते पाकणीदरम्यान आठ किमीचे काम होणार आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सल्लागार मंडळाची बैठक नियोजन भवन येथे होणार आहे. त्यात त्यांच्याकडून सल्ला घेण्यात येणार आहे. त्यावेळी स्मार्ट सिटीचे तीन सल्लागार कंपन्यांना दिलेली रक्कम आणि त्याचे कामे, शहरात सुरू असलेले कामाबाबत प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्मार्ट सिटी कंपनीची ४० सल्लागार मंडळाची सातवी बैठक बुधवारी होणार आहे. या वेळी कंपनीच्या कामाबाबत प्रश्नावली विचारले जाण्याची शक्यता आहे. शहरात कामासाठी खोदाई झाले असून, त्याबाबत या बैठकीत चर्चा होईल. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने उजनी ते सोलापूर १०५ किमी अंतराचे जलवाहिनी घालण्यात येणार आहे.
