Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हळहळला, 12 जणांचा मृत्यू, सोलापुरातील दोघांचा समावेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हळहळला, 12 जणांचा मृत्यू, सोलापुरातील दोघांचा समावेश

Surajya Digital
Last updated: 2023/04/17 at 4:13 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
○ ‘शिंदे साहेब, तुम्हाला माफी नाही’, ‘एवढी लोकं राजकीय स्वार्थासाठीच बोलावली’स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ ‘शिंदे साहेब, तुम्हाला माफी नाही’, ‘एवढी लोकं राजकीय स्वार्थासाठीच बोलावली’

 

मुंबई / सोलापूर : खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा मृत्यू झाला. काहींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने महाराष्ट्र हळहळला आहे. सोशल मीडियातून दुःख व्यक्त केले जात आहे.  The unfortunate incident rocked Maharashtra, 12 people died, including two from Solapur आयोजनकर्त्यांविरोधात विरोधी पक्षांसोबत अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली असून उपचार सुरु असलेले श्रीसदस्य लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे.

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सोहळ्यासाठी आलेल्या 600 जणांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याची माहिती समोर आली आहे. 20 हून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आहे.

 

खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी (ता.16) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १२ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढेल अशी भिती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात बाळे येथील कलावती सिद्राम वायचळ (बाळे, तोडकर वस्ती) आणि संगीता संजय पवार (मंगळवेढा) यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.

 

कालच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणाऱ्या अनुयायांनी खारघर येथे मोठी गर्दी केली होती. सकाळी १० वाजताचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत लांबला. त्यामुळे इतके तास श्रीसेवक रणरणत्या उन्हातच बसून राहिले होते. अनेक तास पाणी न मिळाल्याने आणि वरुन कडक उन्हाच्या झळांमुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. जवळपास ३०० श्रीसेवक उष्माघातामुळे अस्त्यवस्थ झाले होते. यापैकी २६ जणांवर सध्या नवी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान यामुद्यावरुनही सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा राजकारणाचा मुद्दा नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार यांनी काल रात्री रुग्णालयात जावून श्रीसेवकांची भेट घेतली. आज राज ठाकरे यांनीही रुग्णांची विचारपुस केली. सरकारविरोधात सदोष- मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. राज ठाकरे म्हणाले, कार्यक्रम संध्याकाळी घ्यायला हवा होता. गर्दी जमविण्या- मागे शक्तीप्रदर्शनाचा हेतू दिसतो.

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे साहेब, सदगुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या वेळेवरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

कलावती सिद्राम वायचळ (बाळे, तोडकर वस्ती)

 

लाखो सदस्य जमली होती. यावेळी मान्यवरांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मात्र श्रीसदस्यांना उन्हात बसावं लागलं होतं.  श्रीसदस्यांचा मृत्यूला हे सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात केला. तर याप्रकरणी आपण थेट राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार, त्यांना पत्र लिहून याची माहिती देणार आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्य शासनाचा असल्याने राज्य शासनच या मृत्युस जबाबदार आहे. त्यामुळे राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या श्री सदस्यांच्या मृत्यूबाबत टिका करत प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. राज ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन उष्माघाताने आजारी पडलेल्या रुग्णांची भेट घेतली. ‘कालचा प्रसंग राज्य सरकारला टाळता आला असता. कुणाला जबाबदार धरावं तेच कळत नाही. एवढे लोक राजकीय स्वार्थासाठीच बोलावली जातात. धर्माधिकारी यांना राजभवनावर बोलावून पुरस्कार देता आला असता. 71 जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे, ICU मध्ये काहींवर उपचार सुरु आहेत’, असे ठाकरे म्हणाले.

 

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?

 

मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #unfortunate #incident #rocked #Maharashtra #12people #died #including #two #Solapur, #दुर्दैवी #घटना #महाराष्ट्र #हळहळला #12जणांचा #मृत्यू #सोलापूर #दोन #समावेश #श्रीसदस्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अतिक अहमद हत्याप्रकरण सर्वोच्च न्यायालयात; आरोपी म्हणाले प्रसिध्दीसाठी हत्या केली, सुनावली कोठडी
Next Article त्या बातम्या खोट्या : पवार भडकले – कारण नसताना वावड्या का उठवता ?

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?