Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

admin
Last updated: 2025/04/11 at 1:04 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)।केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही जाणार आहेत.यानिमित्ताने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा शनिवारी (दि.१२) दुर्गराज रायगडला भेट आणि त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अमित शाह रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित शहा शुक्रवारी(दि.११) रात्री पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शनिवारी(दि.१२) सकाळी त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात होईल. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता रायगड किल्ल्याला भेट, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित शहा येथील कार्यक्रमात सहभागी होतील.त्यानंतर दुपारी २ वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होतील. सुनील तटकरे यांच्याकडे दुपारच्या भोजनानंतर साडेतीनच्या सुमारास अमित शहा यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईत एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रात्री ते सह्याद्री अतिथीगृहात पोहचतील.

You Might Also Like

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

सोलापूर : ऑपरेशन सिंदूरसाठी शेकडो महिलांचा कुंकुमार्चन सोहळा

उजनी धरणात ६ टीएमसी पाणी

अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस मजबूत – खा. प्रणिती शिंदे

सोलापुरात पाऊस अन्‌ दमटपणा कोकणासारखाच

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी
Next Article ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Latest News

राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News May 28, 2025
अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
देश - विदेश May 28, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
देशात कोरोनाचे १०४७, तर राज्यात ६६ नवीन रुग्ण
महाराष्ट्र May 28, 2025
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र May 28, 2025
मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी
महाराष्ट्र May 28, 2025
राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
महाराष्ट्र May 28, 2025
शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर बसणार महागाईची झळ
महाराष्ट्र May 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?