अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.)
पहलगाम जम्मू कश्मीर मधील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने अमरावती शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शहरातील जयस्तंभ चौक येथील मुत्रीघरावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी पाकिस्तानचा ध्वज पायपुसण्यासाठी ठेऊन झालेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला. लघुशंकेसाठीं प्रत्येक नागरिक हा पाकिस्तानचा ध्वज तुडवून ये जा करत होता.
अशा अनोख्या पद्धतीने पाकिस्तानचा निषेध करण्यात आला व यावेळी मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी उपशहर प्रमुख पंजाबराव तायवाडे उपशहर प्रमुख विजय जी ठाकरे संजय थुले विभाग प्रमुख गोविंदजी दायमा राजू हिरे संदीप मानेकर आनंद राठी उमेश केडिया रुपेश आलेकर लाला अंजुम मनीषा रामावत प्रवीण केशरवाणी शाखाप्रमुख जुगल दवे युवा सेना शाखाप्रमुख जवरगेट निकेश शर्मा विभाग प्रमुख विनोद शर्मा विनोद माडवे व ईतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.