Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2022/01/07 at 12:00 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यात पुढील 4 दिवस काही भागात अवकाळी पाऊस (unseasonal rains) आणि गारपिट (Hailstorm)  होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक, नंदूरबार आणि धुळे, पालघर, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात पावसाची  शक्यता आहे. 9 जानेवारी  (January) रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तसेच बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, उस्मानाबाद येथे पाऊस पडेल.

देशाच्या उत्तरेकडील भागात पश्चिमी विक्षोभमुळे दहा जानेवारीपर्यंत काही भागात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 9 जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

वातावरणात सध्या गारवा असला तरी राज्यातील काही भागात याची तीव्रता कमी-जास्त आहे. काही भागात तर ढगाळ वातावरण दिसत असून हवामानामध्ये बदल झालेला दिसतोय. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटास पाऊस तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (warning)

राज्यात 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसू शकतो. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात (maharashtra) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज ( Guess) व्यक्त करण्यात आलाय.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आगामी चार दिवस ( four days) राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे हुडहुडी  (Hudhudi) कमी झाली असली तरी अजूनही वातावरणात गारवा जाणवत आहे. काही ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना होतोय.या पिकांना थंडीचे वातावरण ( Cold weather) चांगले पोषक असते. पोषक वातावरण मिळाल्याने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते. सध्याचा गारवा या पिकांसाठी संजिवनी (Sanjivani) ठरणार आहे.

• 8 जानेवारी : जळगाव, नंदूरबार, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत पाऊस पडले.

• 9 जानेवारी : बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे पाऊस पडेल.

• 10 जानेवारी : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जालना, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #Hailstorm #warning #unseasonal #rains #next #fourdays #state, #राज्यात #पुढील #चारदिवस #गारपिट #अवकाळी #पावस #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक
Next Article 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?