Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: यूपीएससीचा निकाल जाहीर, देशात प्रदिपसिंह अव्वल तर महाराष्ट्रातून नेहा भोसलेची बाजी; येथे पहा निकाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

यूपीएससीचा निकाल जाहीर, देशात प्रदिपसिंह अव्वल तर महाराष्ट्रातून नेहा भोसलेची बाजी; येथे पहा निकाल

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 1:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली  : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा  2019 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. तर जतिन किशोर आणि प्रतिभा वर्मा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. या परीक्षेतून पात्र ठरलेल्या एकूण 829 मेदवारांची विविध पदांवरील नियुक्त्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेनं.

महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने 2018 मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937 वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018 मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143  वा क्रमांक मिळवला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अंतिम निकाल https: //www.upsc.gov.in/ यावर पाहता येईल.

या परीक्षेतून जे पात्र ठरले आहेत त्या उमेदवारांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांची यादी यूपीएससीने जाहीर केली आहे.  लेखी परीक्षा सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आली होती. तर फेब्रुवारी- ऑगस्ट 2020  दरम्यान व्यक्तिमत्व चाचणी घेतली होती. त्याचा अंतिम निकाल जाहीर केला आहे.

गुणवत्तेनुसार उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा (ग्रुप ए आणि ग्रुप बी) या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या सेवा परीक्षेतून IAS, IPS आणि IFC, भारतीय टपाल सेवा, भारतीय टपाल सेवा, यूपीएससी नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवांसाठी निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. यात प्रारंभिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

TAGGED: #यूपीएससीनिकाल #देशातप्रदिपसिंह #महाराष्ट्रातनेहाभोसले #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाढत्या कोरोनामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाचा लॉकडाऊन जाहीर
Next Article यूपीएससीमध्ये शेतकरी कुटुंबातील पंढरपूरच्या देशमुख तर मंगळवेढ्यातून खांडेकरचे यश

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?