वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादण्यात येणारा २५% टॅरिफ आणखी ७ दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. तो मूळत: आजपासून (१ ऑगस्ट) लागू होणार होता, मात्र आता तो ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. दरम्यान, कॅनडावरचा ३५% टॅरिफ आजपासूनच लागू करण्यात आला आहे.
ट्रम्प यांची नवी यादी
-
भारतावर : २५% टॅरिफ (७ ऑगस्टपासून)
-
पाकिस्तानवर : १९% (दक्षिण आशियातील सर्वात कमी दर)
-
कॅनडा : ३५% (१ ऑगस्टपासून लागू)
-
सिरिया : ४१% – सर्वाधिक टॅरिफ
-
लाओस, म्यानमार : ४०%
-
स्वित्झर्लंड : ३९%
-
इराक, सर्बिया : ३५%
-
ब्राझील, ब्रिटन : १०%
-
न्यूझीलंड : १५%
पार्श्वभूमी
-
ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये जागतिक टॅरिफची घोषणा केली होती.
-
सुरुवातीला ९० दिवसांची मुदत देत ३१ जुलै अंतिम तारीख निश्चित केली होती.
-
अमेरिकेने आतापर्यंत केवळ ७ देशांसोबत व्यापार करार केले आहेत.
भारतावर होणारा परिणाम
अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील खालील उद्योगांना मोठा फटका बसू शकतो :
-
स्टील व अॅल्युमिनियम
-
ऑटोमोबाईल्स
-
कापड उद्योग
-
इलेक्ट्रॉनिक्स
-
दागिने
याशिवाय, अमेरिकेने स्पष्ट केले आहे की रशियाकडून शस्त्रे व तेल खरेदीबाबत भारतावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.