Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिका : हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

अमेरिका : हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/04/11 at 12:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन, 11 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळून थेट हडसन नदीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स यांनी या दुर्घटनेची माहिती दिली.या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्सकडून चालवलं जात होतं. हेलिकॉप्टरने सायंकाळी तीनच्या सुमारास उड्डाण केलं. हडसन नदीवरून उत्तर दिशेनं जात असताना ते नदीत कोसळलं आणि बुडालं.हेलिकॉप्टरमध्ये एक स्पॅनिश कुटुंब होते.यामध्ये सिमेन्स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुलं होती. या पाचही जणांसोबत पायलटचासुद्धा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हेलिकॉप्टर हवेतच तुटताना दिसलं. त्याचा मागचा भाग आणि प्रॉपलर वेगळं होऊन खाली पडत होतं. प्रॉपलर हेलिकॉप्टरपासून वेगळं झाल्यानंतर फिरत राहिलं. सोशल मीडियावर याचे व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले आहेत.

या अपघाताचे कारण तपासले जात असल्याचे पोलिस आयुक्त टिश यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीवरून उत्तरेकडे जाण्याऐवजी दक्षिणेकडे गेले. नंतर न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर दक्षिणेकडे परतले, जिथे ते कोसळले. कमिशनर टिश म्हणाले की, बहुतेक प्रवाशांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. मॅनहॅटन ओलांडून हडसन नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या जर्सी सिटीमधील आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. ट्रम्प म्हणाले की, हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून भयंकर दुर्घटना घडली. यात पायलट, पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. दुर्घटनेचा व्हिडीओ भितीदायक आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना यातून सावरण्याची ताकद मिळू दे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 'Mukkam Post Devach Ghar' now on Amazon Prime ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ आता ॲमेझॉन प्राइमवर
Next Article दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर केएल राहुलचं खास अंदाजात सेलिब्रेशन

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?