Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी, ७ देशांवर कडक निर्बंध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी, ७ देशांवर कडक निर्बंध

admin
Last updated: 2025/06/05 at 5:41 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

वॉशिंग्टन, 5 जून (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली. ट्रम्प यांनी बुधवारी( दि.४) ही घोषणा केली. यासह ७ देशांमधील लोकांच्या प्रवेशावरही ट्रम्प यांनी कठोर प्रवास निर्बंध लादले आहेत. दहशतवादी आणि इतर धोक्यांपासून संरक्षणासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे म्हणत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एका निर्णयावर स्वाक्षरी केली होती.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवासावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी या देशांव्यतिरिक्त, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील लोकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणली आहे. सोमवारी(दि.९) दुपारी १२ वाजल्यापासून प्रवास बंदी लागू होईल.

“मला अमेरिकेची आणि तिच्या लोकांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी काम करावे लागेल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता, ज्यामध्ये राज्य आणि गृह सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना अमेरिकेच्या सुरक्षेसंदर्भात एक अहवाल तयार करण्यास आणि विशिष्ट देशांमधून येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात का हे तपासून घेण्यास सांगितले होते. त्या अहवालानंतर, १२ देशांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे आणि ७ देशांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बंगळूरू चेंगराचेंगरीनंतर विराट कोहली व्यथित
Next Article नाशकात भरधाव कार शिरली बंगल्यात; पाच जणांचा मृत्यू

Latest News

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?