Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

admin
Last updated: 2025/06/18 at 7:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 18 जून (हिं.स.)।इस्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस धोकादायक होत चाललं आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात, दोन्ही देश एकमेकांवर सतत क्षेपणास्त्रे हल्ले करत आहे.अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राइल विरोधात युद्दाची घोषणा केली आहे.या सर्व घडामोडीवर, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केली असून इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिला आहे. यामुळे आता इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्षादरम्यान, मागच्या तीन दिवसांमध्ये अमेरिकेची किमान ३० लढाऊ विमानं ही अमेरिकेच्या विविध तळांवरून युरोपमध्ये पाठवण्यात आली आहेत. ही सर्व विमाने सैन्यदलांमधील टँकर विमानं आहेत. ज्यांचा वापर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी होतो.

या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना बिनशर्त शरणागती स्वीकारण्यास सांगितले होते. “इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कुठे लपले आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण सध्या तरी त्यांना ठार मारायची इच्छा नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच , इराणमध्ये नागरी वस्त्यांवर आम्हाला हल्ले करायची इच्छा नाही. मात्र आमचा संयम आता संपत चालला आहे, ही गोष्टही खरी आहे. इराणने अणुकरार करणे आवश्यक होते. त्यांना तशी विनंतीही मी केली होती. मात्र इराणने ते मान्य केले नाही. आता चर्चा करावी असे वाटत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची इस्त्राइलने हत्या केल्यानंतरही युद्ध कायम ठेवण्याचा इशारा इराणने दिला आहे.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी (दि. १८) एक्स पोस्ट करत युद्धाची घोषणा केली आहे..अली खामेनी यांनी आपले अधिकार इराणी सैन्याकडे सोपवले आहेत. खामेनी यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये हलवण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांनी आधी “महान हैदरच्या नावाने, युद्ध सुरू झाले आहे,” अशी पोस्ट केली. त्यानंतर काही वेळातच, खामेनींनी इस्रायलला इशारा देत, “आता दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. आम्ही त्यांच्याबाबतीत आता कोणतीही दया दाखवणार नाही,” असं म्हटलं. या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
Next Article वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?