Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्तराखंड : हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

उत्तराखंड : हेलिकॉप्टर कोसळून 5 जणांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/06/15 at 3:15 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

डेहराडून, 15 जून (हिं.स.) : उत्तराखंडमध्ये आज, रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राज्यातील रुद्रप्रयागच्या गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 5 जण होते. या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर प्रवाशांना घेऊन जात असताना पहाटे 5.30 वाजता गौरीकुंड परिसरात कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी, 8 मे रोजी राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यात देखील एक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला होता.

————————-

You Might Also Like

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा

इस्रायलच्या हल्ल्यात इराणची संरक्षण मंत्रालय इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त

नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर

आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती
Next Article मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री

Latest News

इराणची धमकी, ट्रम्प यांचा थेट आणि कठोर इशारा
देश - विदेश June 15, 2025
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २५ ते ३० पर्यटक बुडाल्याची भीती
महाराष्ट्र June 15, 2025
इंद्रायणी घटना : दोघांचा मृत्यू तर ६ जणांना वाचवण्यात यश – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 15, 2025
मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार
सोलापूर June 15, 2025
सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू
सोलापूर June 15, 2025
आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन
महाराष्ट्र June 15, 2025
शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थिक संपन्नता आणण्यासाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे – सुळे
महाराष्ट्र June 15, 2025
सोलापूर विद्यापीठाचा भाभा अणुसंशोधन केंद्राशी करार
सोलापूर June 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?