देहरादून : उत्तराखंडच्या जोशीमठ येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 झाला आहे. आतापर्यंत 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. लष्कराचे 3 आणि हवाई दलाचे 1 हेलिकॉप्टर बचाव कार्य करत आहे. 125 लोक बेपत्ता आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली. ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित जवळपास 100-150 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवारी आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेत अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. ऋषीगंगा वीज प्रकल्पही नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिमकडा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार व इतर ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रहाट यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले की, चमोलीच्या रिनी गावात ऋषीगंगा प्रकल्पाचे पाण्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

* उत्तराखंड सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जाहीर
उत्तराखंडच्या जोशीमठमधील हिमकडा कोसळल्याने मोठी जीवीतहानी झाली आहे. लोकांच्या मदतीसाठी उत्तराखंड सरकारने हेल्प लाइन क्रमांक जाहीर केला आहे. अपघाताशी संबंधित माहितीसाठी आपण 1070 आणि 9557444486 वर कॉल करू शकता. देहरादून, हरिद्वार आणि ऋषिकेश येथे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना सखल भागातून काढले जात आहे. एनडीआरएफच्या तीन पथकांना दिल्लीहून पाठविण्यात आले आहे.
“नदीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने खालील भागात,पूर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात लोकांना सतर्क केले गेले आहे. नदीकाठच्या भागातून नागरिकांना सुरक्षितस्थळी रवाना केले जात आहे. मी सर्वांना विनंती करतो की कोणताही जुना व्हिडिओ शेअर करुन घाबरवू नका. परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली आहेत आपण संयम ठेवला पाहिजे”
त्रिवेंद्रसिंह रहाट – मुख्यमंत्री
