Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वि.प. पोटनिवडणूक : शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

वि.प. पोटनिवडणूक : शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना उमेदवारी

admin
Last updated: 2025/03/17 at 1:13 PM
admin
Share
1 Min Read
Oplus_131072
SHARE

मुंबई, १७ मार्च (हिं.स.) : विधान परिषदेतील पाच जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यामुळे पती संजय खोडके वरिष्ठांच्या सभागृहात, तर पत्नी सुलभा खोडके या कनिष्ठ सभागृहात दिसतील.

२७ मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची आज, सोमवारी शेवटची तारीख होती. त्याच्या काही तासांपूर्वी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काम केलं आहे. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, तेव्हा रघुवंशी यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

धुळे – नंदुरबारचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव सुरुवातीपासून आघाडीवर होतं. त्याशिवाय माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, शिवसेना सचिव, माजी महापौर संजय मोरे, विदर्भातील शिंदे यांचे मजबूत शिलेदार नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावांची सुद्धा चर्चा सुरू होती. मात्र या साऱ्यामध्ये रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

You Might Also Like

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण – आमदार टी. राजासिंह

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो – एकनाथ शिंदे

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानमध्ये विमानतळावर जमियत उलेमा-ए-इस्लामच्या वरिष्ठ नेत्याची हत्या
Next Article केकेआर संघात स्टार बॉलर उमरान मलिकच्या जागी खेळणार चेतन सकारिया

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?