जयपूर , 29 एप्रिल (हिं.स.)।जयपूरच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यंवशीनं नवा इतिहास रचला आहे.आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. एवढेच नाही तर १७ चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतकही आपल्या नावे नोंदवले आहे.
आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक ठरले. याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावे होता. त्याने ३७ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते.वैभव सूर्यंवशीने १५ वर्षांपासून अबाधित असणारा युसूफ पठाणचा रेकॉर्ड मोडीत काढला. या यादीत युनिवर्सल बॉस ख्रिस गेल सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय अर्धशतकासह टी-२- क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा विक्रम आता वैभव सूर्यंवशी याच्या नावे झाला आहे.
त्याने ३५ चेंडूत शतक साजरे केले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा विक्रम याआधी अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीचा मुलगा हसन इसाखिल याच्या नावे होता. त्याने काबूल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्पागेझा लीग २०२२ स्पर्धेत काबूल ईगल्स विरुद्धच्या सामन्यात बूस्ट डिफेंडर्सकडून खेळताना १५ वर्षे ३६० दिवस वयात अर्धशतक झळकावले होते. वैभव सूर्यंवशी याने १४ वर्षे ३२ दिवस वयात अर्धशतक झळकावत त्याचा हा विक्रम मोडित काढला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. पदार्पणाच्या सामन्यात षटकारासह खाते उघडत त्याने यंदाच्या हंगाम गाजवण्याचे संकेत दिले होते. तिसऱ्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करताना त्याने मोठा धमाका केला.