Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैराग रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, चालक – प्रवाशी व बसचालक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वैराग रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, चालक – प्रवाशी व बसचालक जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/29 at 10:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : बार्शीहून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसच्या चालकाने नियंत्रण गमावल्याने बसची छोटा हत्ती आणि छोटा हत्तीची क्रेनला धडक बसली. या झालेल्या विचित्र अपघातात बसचा चालक, छोटा हत्तीचा चालक आणि काही प्रवाशी जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर सोलापूर, बार्शी, वैराग येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही. बसच्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत तर छोटा हत्तीच्या चालकाला डोक्याला व हाताला मार लागला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बार्शी आगाराची (क्र. एमएच 07, सी 7334) ही विना वाहक- विना थांबा बस दुपारी दोन च्या सुमारास सोलापूरला जात असताना वैरागच्या पुढे राळेरासच्या अलीकडे असलेल्या वळणावर चालक विजय स्वामी (वय 46 रा. वडाळा ता. उत्तर सोलापूर) याने बसवरील नियंत्रण गमावल्याने प्रथम समोरील छोटा हत्ती (क्र. एमएच 13 एन 2592) ला जोरात धडकली.

बस वेगात असल्यामुळे या धडकेने छोटाहत्ती त्यापुढील क्रेन वर धडकून जागेवरच पलटी झाला. तर बस पुढे उजव्या बाजूला झाडांना घासत जावून थांबली. या अपघातात बसचा चालक स्वामी, छोटाहत्तीचा चालक गोविंद श्रीकांत वाघमारे (वय 35 रा. वैराग) तसेच प्रवाशी जखमी झाले. छोटाहत्ती बेकरीचे सामान घेवून परिसरातील दुकानांना वाटप करण्यासाठी जात होता. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला, असे सांगण्यात येत होते, मात्र घटनास्थळी उपस्थित असणारांनी बसच्या चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: # वैरागरस्त्यावर #तीनवाहनांचा #विचित्रअपघात #चालक #प्रवाशीबसचालक #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दुस-या वनडेसह भारताने मालिका गमावली, लाजिरवाणा पराभव, मात्र विराटचा कारनामा
Next Article पुण्यात भीषण अपघात, ट्रेलरने आठ वाहनांना उडवले, दोन ठार तर सात जखमी

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?