Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुनःश्च हरिओम… वकीलसाहेब पुन्हा रिंगणात ? शरद बनसोडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पुनःश्च हरिओम… वकीलसाहेब पुन्हा रिंगणात ? शरद बनसोडे

Surajya Digital
Last updated: 2022/10/16 at 5:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मागास वर्गातील जनताही नाराज

मोहोळ / संजय आठवले

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघातून बनसोडे यांनी दोन वेळा निवडणूक लढवली. पहिल्या म्हणजे २००९ च्या निवडणुकीत त्यांना पराजय पत्करावा लागला परंतु दुसऱ्या टर्ममध्ये ते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराजय करून निवडून आले. ही गोष्ट भाजपाच्या व सोलापूर मतदार संघाच्या दृष्टीनेही साधी आणि सामान्य नव्हती, हे मान्य करावेच लागेल. तशा अर्थाने हा एक चमत्कारच होता. Again Hariom… Vakilsaheb in the arena again? Sharad Bansode Solapur MP

 

मात्र या चमत्कारापाठीमागे बनसोडे यांचे कष्ट आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार यांच्याशी कुठलाही अभिनिवेष न ठेवता त्यांनी ठेवलेला संपर्क कारणीभूत होता. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ॲड. शरद बनसोडे यांची गरज असल्याची भावना भाजपाच्याच कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

 

शरद बनसोडे यांनी सावरकर विचार मंचच्या माध्यमातून जिल्ह्यात व मतदार संघात कार्यकत्यांचे जाळे तयार केले. माणसे जोडली. जनसंपर्क निर्माण केला. त्यामुळे ते विजयाजवळही पोहोचले. त्यांच्यासाठी तसा मतदार संघ नवखाच होता. आधी वकिली नंतर चित्रपटसृष्टी आणि मग राजकारण असा त्यांचा प्रवास होता. अशा परिस्थितीतही त्यांची नौका खासदारकीच्या पैलतिरी पोचली ती केवळ सर्वांशी संपर्क आणि थेट बोलणं यामुळेच.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तसे बघितले तर सोलापूर मतदारसंघ हा सुशीलकुमार शिंदे यांचा तसा बालेकिल्लाच, पण या किल्ल्याला कसा छेद गेला, हे त्यांना कळलेच नाही. शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून चांगली आघाडी मिळाली होती, परंतु इतर ठिकाणी त्यांचे मताधिक्य घटले होते. मोदी लाट म्हणा किंवा काहीही म्हणा परंतु मतदारांनी बदल घडवला होता, हे मात्र नक्कीच.

 

बनसोडे हे त्यावेळी राजकारणात नवखे वाटत होते. परंतु त्यांनी ग्रामीण भागात चांगलाच संपर्क ठेवला होता. व्यक्तीगत कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखत जात होते. त्यांचा निधी ग्रामीण भागात खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यावरच नव्हे तर अनगरच्या १२ वाड्यामध्येही पोचवला अन अनगरकरांशीही जवळीकही केली होती. परंतु पक्षाने त्यांना २०१९ डावलले. त्यांच्याऐवजी डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. खरे परंतु त्यांच्या जातीचा दाखला वादग्रस्त ठरला.

 

यात मतदार अन कार्यकर्ते मतदार यांचाही गोंधळ उडाला आहे आणि ते महाराज असल्यामुळे म्हणावे तसे त्यांना आजही जनतेत मिसळता आले नाही अन कार्यकर्त्यांनाही त्यांच्या जवळ पोचता येईना, अशी अवस्था झाली आहे.

 

□ मागास वर्गातील जनताही नाराज

या साऱ्या घडामोडीत मतदार तर नाराज झालाच परंतु मागास वर्गातील जनताही नाराज झाली मग बनसोडे कशात वाईट होते ? असा प्रश्न आज निर्माण होवू लागला आहे. परंतु बनसोडे जरी खासदार नसले तरीही तितक्याच आपुलकीने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतात अन कार्यकर्तेही त्यांना मित्रासारखे आवर्जून भेटतात अडचणी सांगतात अन कामेही करून घेतात. ते आजही पक्षाचे प्रामाणिक गटबाजी विरहीत काम करतात. त्यामुळेच बनसोडे सर्वांना जवळचे वाटतात यामुळे शरद बनसोडे यांना पुन्हा सोलापूर मतदारसंघातून मिळावे अशी भावना व्यक्त होत आहे.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #AgainHariom... #Vakilsaheb #arenaagain? #SharadBansode #solapur #political, #पुनःश्चहरिओम #वकीलसाहेब #पुन्हा #रिंगणात #शरदबनसोडे #भाजपा #सोलापूर, #ॲडशरदबनसोडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला ? दिलीप मानेंची राजकीय अवस्था
Next Article अंधेरी पोटनिवडणूक : राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?