सोलापूर, 5 मे (हिं.स.) : न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसांनंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे. ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नाही.तशातच डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्या हॉस्पिटलच्या घरी राहायला देखील आल्याचे विश्वसनीय सूूत्रांनी सांगितले.
डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. डॉ. आश्विन यांचे हॉस्पिटलचे घर सोडून मोदी येथील घरात स्थलांतर करणे यासह वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलहाचीही चर्चा रंगली आहे. तशातच आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे.
दोघे भारत सोडून गेल्याचीही कुजबुज कर्मचार्यांमध्ये सुरू आहे.डॉ. दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचेही काहीजण सांगत आहेत. डॉ. शोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार आहेत. त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. शोनाली या 30 मे नंतर ओपीडी पहाणार आहेत असेही काही कर्मचार्यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चा असल्यातही ते दोघे नेमके गेले कुठे याची कोणालाच कल्पना नाही.————–