Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विठुरायाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विठुरायाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 6:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्व स्तरातून आवाज उठू लागला आहे. जर राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका, असं वारकरी संप्रदायाने म्हटलं आहे.

विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी सेना वंचितच्या मदतीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले असताना, याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखादा कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकही कोरोनाची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे.

मंदिर सुरु करण्याबाबत प्रशासन अजूनही साशंक असून सध्या कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता मंदिर उघडणे सध्या अवघड आहे. मात्र जर सरकारने आदेश दिले तर त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार दर्शन व्यवस्था सुरु केली जाईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे म्हणणे आहे.

* मुखदर्शन घेऊ, सॅनिटायझर नको

कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एकवेळ आम्ही कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारु नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. ज्या पंढरपूरचे महत्त्व देवाच्या पायावरची दर्शनाने आहे ते बाजूला ठेवण्यास वारकरी संप्रदाय तयार झाला आहे. याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी भजन कीर्तनास परवानगी मिळावी ही आग्रही मागणी वारकरी करत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #सॅनिटायझर #वारकरी #विठुराया #विरोध #फवारण्यास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतसिंह प्रकरणात रियाने नष्ट केले पुरावे; अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रियावर गुन्हा दाखल
Next Article हिंदू देव – देवतांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी हिर खानला अटक; नातेवाईकांकडे बसली होती लपून

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?