Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रत्नागिरी : वासुदेव शिवराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

रत्नागिरी : वासुदेव शिवराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

admin
Last updated: 2025/03/08 at 2:43 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात आज रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे झाली.

कै वासुदेव शिवराम सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २१ वर्षांखालील या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ कै. वासुदेव सावंत यांच्या कन्या ॲड. कल्पलता भिडे , शैलेश सावंत , विजय भिडे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी रत्नागिरीतील तसेच मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंसह जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे आदी बुद्धिबळप्रेमी यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील लहान वयाच्या व युवा खेळाडूंना क्लासिकल डाव लिहून खेळण्याची संधी मिळावी, या हेतूने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा घेतली जाईल. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे क्लासिकल फिडे मानांकन असलेल्या जिल्ह्यातील चार खेळाडूंसह एकूण छत्तीस बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बहुतांश ठिकाणी बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच मोठ्या प्रमाणात चालू आहेत. खेळाडूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळतो व खेळ विकसित होण्यासाठी मदत होते. रत्नागिरी जिल्ह्यात क्लासिकल बुद्धिबळाचा प्रसार व्हावा, या हेतूने अशा विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना विधानसभेत श्रद्धांजली माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना विधानसभेत श्रद्धांजली
Next Article वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार! – पुणे सीपी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?