Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्री दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी

Surajya Digital
Last updated: 2021/12/18 at 6:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अलोट गर्दी केली. तसेच रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यात १०७ स्वामी भक्तांनी रक्तदान केले.

श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्तात्रयांचे चौथे अवतार समजले जाणारे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त व्हावे, याकरिता भाविक दत्त जयंतीला वटवृक्ष मंदिरात गर्दी करतात. दत्तजयंतीच्या पावन मुहूर्तावर कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीदर्शन सुलभतेने होणे करिता भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.

यावेळी कोरोना नियमावलीचे पालन म्हणून मंदिरात प्रवेश करणाऱ्या स्वामी भक्तांना मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. सर्व स्वामी भक्तांना ठराविक अंतराने परंतु टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनेक स्वामी भक्त आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन धन्य झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषाने वटवृक्ष मंदिर परिसर व अक्कलकोट नगरी दुमदुमली. दत्त जयंती निमित्त राज्याच्या विविध भागातून पायी चालत आलेले पालखी व दिंडी सोहळे अक्कलकोटी विसावले. येणाऱ्या सर्व दिंडी व पालखी सोहळ्याच्या स्वामी भक्तांची दर्शनाची निवासाची व भोजन प्रसादाची व्यवस्था देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आली होती.

श्री दत्त जयंती निमित्त हेडगेवार रक्तपेढी सोलापूर व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०७ भाविकांनी रक्तदान केले.

सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीनिवास इंगळे, मंगेश फुटाणे, प्रा. शिवशरण अचलेर, नागनाथ गुंजले, आदींनी परिश्रम घेतले.

अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Crowd #devotees #Akkalkot #VatvrikshaMandir #occasion #ShriDutt #Jayanti, #श्रीदत्तजयंती #अक्कलकोट #वटवृक्ष #मंदिरात #भाविक #गर्दी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरमध्ये खळबळ; माजी आमदारासह २९ जणांना अटक
Next Article अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला; शिवसेनेतील अंतर्गत कलहाला वाचा फुटली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?