Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नव्यासह जुन्या वाहनांनाही लागणार बारकोड – होलोग्राम नंबर प्लेट, पाट्या बदलून घ्याव्या लागणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नव्यासह जुन्या वाहनांनाही लागणार बारकोड – होलोग्राम नंबर प्लेट, पाट्या बदलून घ्याव्या लागणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 7:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : वाहनाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर अशा वाहन क्रमांक पााट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) नव्या वाहनांबरोबर आता जुन्या वाहनांनाही लावण्यात येणार आहेत. बारकोड, होलोग्राम असलेल्या या पाट्या जुन्या वाहनांनाही बसवण्याची तयारी परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनचालकांनाही येत्या काळात क्रमांक पाट्या बदलून घ्याव्या लागणार आहेत.

जुन्या वाहनांनाही नव्या पद्धतीच्या क्रमांक पाट्या लागू करण्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्वच जुन्या वाहनांच्या पाट्या एकदम बदलल्यास गोंधळ उडण्याची शक्यता असल्याले टप्पटप्प्यांने ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथम चार चाकी वाहने, त्यानंतर दुचाकी आणि त्यानंतर अन्य जुन्या वाहनांच्या पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रक्रिया सुरू होण्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर उजाडेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर असलेल्या क्रमांक पाट्या बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादकांनी किंवा वितरकांनी नव्या वाहनांना बारकोड, होलोग्राम असलेल्या पाट्या बसवून देणे बंधनकारक करण्यात आले.

* १ एप्रिलपासून अंमलबजावणी

१ एप्रिल २०१९ पासून नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. १ एप्रिलनंतरच्या वाहनांना नव्या पद्धतीच्या पाट्या नसल्यास वाहन नोंदणी न करण्याची सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. आता नव्या वाहनांबरोबरच एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहनांच्या क्रमांक असलेल्या पाट्या किंवा क्रमांक बदलण्यात येतात. त्यामुळे क्रमांक बदलल्यामुळे अनेकदा वाहन सापडत नाही आणि चोर पकडणे अशक्य होते. नव्या पद्धतीची पाटी ही अ‍ॅल्युमिनियमची असून ती वाहनाला कायमस्वरूपी लावण्यात आल्याने बदलली जाऊ शकत नाही. नवीन पाटी ही बदललेल्या जागीच लावू शकतो.

– नव्या पद्धतीच्या पाटीची वैशिष्ट्ये

* सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना लावण्यात येणाऱ्या पाट्यावरील क्रमांक ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे टाकण्यात येतो.

* बारकोड आणि थ्रीडी होलोग्रामचाही या पाट्यावर समावेश असतो.

* संबंधित बारकोड आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास त्यांना वाहनांबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते

* बारकोड केंद्रीय मंत्रालयाच्या वाहन प्रणालीशीही जोडलेला असतो

* ही पाटी वाहनाला कायमस्वरूपी बसवलेली असेल. त्याची नक्कलही कुणी करू शकणार नाही.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Vehicles #barcodes #hologram #numberplates #signs #replaced, #वाहनांना #लागणार #बारकोड - होलोग्राम #नंबरप्लेट #पाट्याबदलून #घ्याव्यालागणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नोटाबंदीमुळे देशात बेरोजगारी सर्वोच्च स्तरावर – डॉ. मनमोहन सिंग
Next Article सेक्स स्कॅडल : आणखी एका मंत्र्याची सीडी आली समोर, तक्रार दाखल

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?