Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कायमस्वरुपी जागा दिल्याशिवाय पालखी मार्गावरील घरे काढण्यास विरोध; आंदोलन छेडण्याचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

कायमस्वरुपी जागा दिल्याशिवाय पालखी मार्गावरील घरे काढण्यास विरोध; आंदोलन छेडण्याचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 6:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर : माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून यामध्ये अनेक गरीब लोकांच्या शासकीय जागा व घरे या मार्गात जात आहेत. त्यांना मोबदला ही मिळणार नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार आहे.

माळशिरस येथील पंचायत समितीमध्ये पालखी मार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकरी व इतर बाधित लोकांची बैठक माढा लोकसभेचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रांताधिकारी शमा पवार, आ. रणजितसिह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, के के पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, प्रताप पाटील, हसीना शेख, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, गणेश पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, अॅड. सोमनाथ वाघमोडे, राष्ट्रीय महामार्ग समितीचे अध्यक्ष शंकरराव काळे पाटील, बाळासाहेब सरगर , राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे यांची उपस्थिती होती.

यावेळी गावठाण बाधित संघर्ष समितीचे नेते आणि पं.स. सदस्य अजय सकट यांनी महत्वाचा मुद्दा मांडला. शासकीय जागेत असणाऱ्या घरे व घरकुले महामार्गात जात आहेत. धर्मपुरी ते दसुर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील शेकडो गरीब, मागासवर्गीय समाजातील लोकांचे घरे उदध्वस्त होणार आहेत. सरकारने त्यांना कायमस्वरूपी जागा व घरे बांधून द्यावेत, त्यांची सोय करावी, अनेकांचा सर्वे झाला नाही, तो तात्काळ करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, ठेकेदार यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा आम्ही घरे, जागा भूसंपादन करू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

“महामार्ग बाधित लोकांनी जर ठेकेदार व अधिकारी जबरदस्तीने घरे पाडून मोबदला अथवा कायमस्वरूपी जागा व घर देत नसतील, त्यासाठी मोठा लढा उभा करणार आहे. त्यामुळे अशा बाधित बांधवांनी संपर्क साधावा. कायमस्वरूपी पर्यायी जागा व घर बांधून द्यावेत, आपली आग्रही मागणी आहे”

अजय सकट – माळशिरस पंचायत समिती सदस्य

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #पालखीमार्ग #संसार #उघड्यावर #वेळापूर #कायमस्वरुपी #आंदोलन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात कोरोनाचे आज पुन्हा 127 रुग्ण वाढले, एक मृत्यू तर 185 जण कोरोनामुक्त
Next Article सांगलीतील ‘तो’ वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय; पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी निर्णयाबद्दल व्यक्त केले समाधान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?