Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू तर मुलगा जखमी; ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू तर मुलगा जखमी; ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत

Surajya Digital
Last updated: 2020/08/07 at 5:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वेळापूर :  पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मायलेकरांना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी पहाटे ६.३० वाजता बोंडले (ता.माळशिरस) येथे घडली.

घटनेची फिर्याद प्रत्यक्षदर्शी प्रल्हाद देवराव जाधव यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून जखमी मुलावर वेळापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. माधुरी नवनाथ देशमुख (वय ३५ वर्षे रा.विखळे जि. सातारा) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांंच्याकडे आल्या होत्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज पहाटे नेहमीप्रमाणे मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख (वय ११ वर्षे) याच्यासह मॉर्निंगवॉकसाठी पुणे पंढरपूर पालखीमार्गावर गेल्या होत्या. दोघे वेळापूरच्या दिशेने घरापासून चारशे मीटर दूरवर जात असतानाच पाठीमागून येणार्‍या मालवाहतूक ट्रकने (एम.एच.२५ यू ६९९९) त्या दोघांना धडक दिली असता ट्रकखाली चिरडल्याने माधुरी देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत  मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने तेथून केले.

मयत माधुरी देशमुख यांचे वेळापूर येथे शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर बोंडले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती,सासू,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

* ट्रकचालकास पाठलाग करुन पकडले

अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. मद्यधुंद आसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी प्रल्हाद देवराव जाधव व गावातील युवकांच्या सतर्कतेने त्याचा पाठलाग करून त्या ट्रकचालकास मालवाहतूक ट्रकसह माळशिरस येथे पकडले. प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून वेळापूर पोलिस ठाणे यांचेकडून पंचनामा केला. मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक नबिसा लाडलेसाहब पटेल (वय ३५)  व क्लिनर मल्लिकार्जुन भिमराव धोरे (वय ४२ रा.रामामोला शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा)  या दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #वेळापूर #अपघात #महिलेचामृत्यू #मॉर्निंगवॉक #ट्रकचालक #मद्यधुंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महसूलमंत्री थोरात, महिला बालविकास मंत्री ठाकूर उद्या घेणार सोलापुरातील कोरोनाचा आढावा
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज आठ मृत्यू तर 291 नवे बाधित रुग्ण; लॉकडॉउन करुन रुग्णांमध्ये वाढ

Latest News

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र May 29, 2025
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
देश - विदेश May 29, 2025
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
महाराष्ट्र May 29, 2025
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Top News May 29, 2025
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
सोलापूर May 29, 2025
सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर May 29, 2025
भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
महाराष्ट्र May 29, 2025
घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र May 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?