Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदारांची लक्षवेधी विद्यापीठातील भ्रष्टाचारावर; कुलगुरूंची चौकशी होणार निवृत्तीच्या उंबरठ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आमदारांची लक्षवेधी विद्यापीठातील भ्रष्टाचारावर; कुलगुरूंची चौकशी होणार निवृत्तीच्या उंबरठ्यावर

Surajya Digital
Last updated: 2023/03/18 at 4:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ पेपर तपासणीत केला घोळस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● ५ वर्षात ४० कोटींचा भ्रष्टाचार : आ. सातपुते● देवळाणकर करणार चौकशी● दोषी आढळल्यास निवृत्तीचे लाभ रोखणार

सोलापूर : फक्त एकाच जिल्ह्यासाठी असणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ म्हणजे सोलापूरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. या विद्यापीठातील भ्रष्टाचारावर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा पाढा सभागृहात वाचला आहे.  MLAs focus on university corruption; The Vice-Chancellor will be investigated. On the verge of retirement, Solapur Punyashlok Ahilya Devi Holkar त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परिणामी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कुलगुरूंना आता चौकशीला तोंड द्यावे लागणार आहे.

 

कोविड काळातील ऑनलाईन पेपर तपासणी, क्रीडा स्पर्धेतील घोटाळा आणि कुलगुरूंकडून होणारा अधिकारांचा गैरवापर यावर माळशिरसचे भाजप राम सातपुते यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली. पेपर तपासणीतील भ्रष्टाचाराचा आकडा कोट्यवधींवर गेल्यामुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाला खुलासा करण्याचा आदेश दिला होता. हा खुलासाही अमान्य झाल्यामुळे उच्च पदस्थ अधिका-यांमार्फत स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.

 

□ पेपर तपासणीत केला घोळ

 

कोविडच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या. या परीक्षेतील पेपर तपासणीचे कंत्राट कुलगुरूंनी एका कंपनीला दिले. राज्यातील इतर विद्यापीठात ऑनलाईन पेपर तपासणीचा दर हा प्रती पेपर ८ ते १२ रुपये असताना कुलगुरूंनी प्रती पेपर ३५ रुपये दर दिला. याशिवाय विद्यापीठाने घेतलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही गैरव्यवहार झाला असून विद्यापीठ कँटिनच्या कंत्राटातही घोटाळा असल्याचा आरोप आ. सातपुते यांनी केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● ५ वर्षात ४० कोटींचा भ्रष्टाचार : आ. सातपुते

 

सोलापूर विद्यापीठात दरवर्षी ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. एका वर्षाला ८ कोटी म्हणजे पाच वर्षाला ४० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आ. सातपुते यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून माध्यमांकडे कोणताही खुलासा करण्यात आला नाही. याबाबत कुलगुरूंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कुलगुरूंची बाजू समजू शकलेली नाही.

● देवळाणकर करणार चौकशी

 

दरम्यान, आ. सातपुते यांच्या लक्षवेधीनंतर उच्च शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठाकडून खुलासा मागवला. मात्र विद्यापीठाचा खुलासा आ. सातपुते यांचे समाधान करणार नव्हता. त्यामुळे त्यांनी हा विषय सभागृहात ताणून धरला. शेवटी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरूंची चौकशी करेल, अशी माहिती सभागृहात दिली.

 

● दोषी आढळल्यास निवृत्तीचे लाभ रोखणार

 

दरम्यान, कुलगुरू फडणवीस ह्या दि. ५ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी देवळाणकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरू फडणवीस यांची चौकशी करेल आणि दि. ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करेल. या अहवालात कुलगुरू दोषी आढळल्यास त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ रोखण्यात येतील, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात केली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कुलगुरूंना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #MLAs #focus #university #corruption #Vice-Chancellor #investigated #verge #retirement #Solapur #Punyashlok #AhilyaDeviHolkar, #आमदार #लक्षवेधी #विद्यापीठ #भ्रष्टाचार #कुलगुरू #चौकशी #निवृत्ती #उंबरठ्यावर, #सोलापूर #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, विविधांगी भूमिका साकारल्या
Next Article सोलापूरचे पालकमंत्री बदला… अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करणार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?