Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुलीवर केले दुष्कर्म, पीडितेच्या मैत्रिणीचाही विनयभंग; आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मुलीवर केले दुष्कर्म, पीडितेच्या मैत्रिणीचाही विनयभंग; आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2023/01/24 at 1:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ वृध्द महिलेचा घरात पडून मृत्यू 

सोलापूर – एका मुलीवर दुष्कर्म केल्याच्या ऑरोपावरुन दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय ३८) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ठोठावली. Girl was raped, victim’s girlfriend was also molested; Three years of hard labor for the accused Solapur

 

नोव्हेंबर २०१६ मध्ये आरोपीने पीडितेच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून तिला मदतीसाठी घरात बोलाविले व तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर त्याने तिला तू जर सदरची घटना कोणास सांगितली तर तुझ्यावर चोरीचा आळ घेईन, अशी धमकी दिली. आरोपीच्या धमकीस घाबरुन पीडितेने घटना तिच्या घरी कोणालाही सांगितली नाही. परंतू तिने ही घटना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला सांगितली.

त्यानंतर मे २०१६ मध्ये आरोपीने पीडितेच्या मैत्रिणीचा विनयभंग केला. त्यावेळी पीडितेच्या मैत्रिणीने स्वतःसोबत घडलेली घटना तसेच पीडितेवर झालेल्या अत्याचाराबाबत स्वतःच्या व पीडितेच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने मुलीला विश्वासात घेवून याबाबत विचारणा केली असता तिने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची घटना आईला सांगितली. घटनेबाबत आईला माहिती मिळाल्यानंतर तिने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबत तसेच पीडितेच्या मैत्रिणीच्या झालेल्या विनयभंगाबाबत फिर्याद दिली. त्या फिर्यादीचा तपास होवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

यात सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार व बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी न्यायालयात चौकशीदरम्यान पीडितेची मैत्रीण फितूर झाली. तरीही पीडिता व इतर साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस धमकी दिल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ८ प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला.

 

दंडातील पाच हजार रुपये पीडितेस नुकसानभरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यात सरकारतर्फे ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.

 

 

□ वृध्द महिलेचा घरात पडून मृत्यू 

 

सोलापूर : सलगरवस्ती, भैरू वस्ती परिसरात एका घरात वृध्द महिला पडून जखमी होऊन मरण पावली. लक्ष्मीबाई सिद्रामप्पा हलबण्णा (वय-६९) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

ही महिला तिच्या घरात एकटीच राहात असून, तिला फिट्सचा आजार असल्याने ती काही दिवसांपूर्वी घरात पडून जखमी झाली. त्यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला होता.तिने उपचार काहीच केले नसल्याने जखमेत रक्त साचून जखम वाढली होती.त्यामुळे ती राहत्या घरात मरण पावली.

 

शेजारील लोकांना घरातून उग्र वास येऊ लागल्याने लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी पाहणी, चौकशी केली असता तिचा पडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. याबाबत सलगरवस्ती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Girl #raped #victim's #girlfriend #molested #Threeyears #hardlabor #accused #Solapur, #मुली #दुष्कर्म #पीडित #मैत्रिणी #विनयभंग #आरोपी #तीनवर्षे #सक्तमजुरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर | श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड
Next Article Solapur court विवाहितेवर अत्याचार करून पैसे, दागिन्यांची लुट; तरुणाचा जामीन फेटाळला

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?