Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गॅसच्या काळ्या बाजारात राष्ट्रवादीचे उपाध्यक्षा विद्या लोलगेंचे नाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गॅसच्या काळ्या बाजारात राष्ट्रवादीचे उपाध्यक्षा विद्या लोलगेंचे नाव

Surajya Digital
Last updated: 2022/06/06 at 1:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ विद्या लोलगे यांची प्रतिक्रिया

सोलापूर : शहरातील सिद्धेश्वर नगर भाग ४ मध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील चाळीस गॅस टाकी जप्त केल्या आहेत. या गॅस टाक्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांच्या प्रेषक इंडेन गॅस एजन्सीच्या असल्याने गुन्ह्यात लोलगे यांचेही नाव घेण्यात आले आहे. NCP’s Vice President Vidya Lolge’s name in the black gas market

 

घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरमधील गॅस धोकादायक आणि असुरक्षितपणे इतरांच्या जीवितास धोका होईल असे ठेवण्यात आले होते.व्यावसायिक सिलिंडरमध्ये इलेक्ट्रिक मोटारच्या सहायाने स्वयंपाकाचा गॅस भरताना आढळून आले. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इण्डेन कंपनीच्या ७९ टाक्या जप्त केल्या आहेत. सोबत नोझल स्वीच, इलेक्ट्रिक बोर्ड,काळ्या रंगाची २० फूट वायर,आयकॉन कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा,रिक्षाचे जुने टायर असा एकूण एक लाख ३८ हजार २७२ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जकीर अब्दुल सत्तार (वय ४२ रा,सिद्धेश्वर नगर भाग ४ ,सोलापूर) असे पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यात प्रेषक गॅस एजन्सीच्या मालकीण विद्या लोलगे यांचे ही नाव आहे.

गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, एपीआय नंदकिशोर सोळुंके व एपीआय दादासो मोरे यांनी पथकासह छापा टाकुन कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/555319562812444/

 

गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई मध्ये इंण्डेन कंपनीचे व्यवसायीक ११ गॅस टाक्या व रिकाम्या १४ टाक्या, घरगुती वापरातील २९ गॅस टाक्या व रिकाम्या २४ व एक व्यवसायीक वापराची एक लहान गॅस टाकी अशा एकुन ७९ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. तसेच इलेक्ट्रीक मोटार इलेक्ट्रीक बोर्ड, वायर, स्वीच व आयकॉन कंपनीचा वजन काटा असा एकूण १ लाख ३८ हजार २७२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ सह भादंवि २८६, ३३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहा. पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, सहा. पोलीस निरीक्षक दादासो मोरे, पोलीस अंमलदार संतोष मोरे, भारत पाटील, अजिंक्य माने, इम्रान जमादार, विनोद रजपुत, राजकुमार पवार, निलेश शिरुर, विजय वाळके, संदिप जावळे, चालक सतीश काटे, नेताजी गुंड यांनी केली आहे.

□ विद्या लोलगे यांची प्रतिक्रिया

या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात विद्या लोलगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी अटकेतला इसम आमचा डिलिव्हरी बॉय नाही, तो नई जिंदगी भागात सामाजिक कार्यकर्ता आहे. अनेक महिलांना त्याने रेशन कार्ड करून दिले आहे. तसेच अनेकांना उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळवून दिले आहे.

सोलापुरात इंडियन ऑइलच्या तीन गॅस एजन्सी आहेत. आमच्या गॅस एजन्सी कडून संबंधित कुटुंबाला गॅस टाकी दिली जाते पुढे त्याचे काय होते आम्हाला काय माहीत नाही. यामध्ये माझे नाव कसे आले याबाबत माहिती घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे म्हटलंय.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/555632576114476/

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #NCP's #VicePresident #solapur #VidyaLolge's #name #black #gas #market, #गॅस #काळ्या #बाजार #राष्ट्रवादी #उपाध्यक्षा #विद्यालोलगे #नाव #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंगळवेढ्याजवळ मोटार उलटून सांगलीचे १० प्रवासी जखमी
Next Article सोलापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; डॉक्टरसह चारजणांना लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?